Viral Video : आगीशी मस्ती, दाढी मिशी पेटली

Viral Video : एक तरुण आपल्या मित्रांना आगीशी खेळ करून दाखवत होता. त्याचे मित्र हा सगळा प्रकार पाहत होते.

Updated: Aug 10, 2022, 11:05 PM IST
Viral Video : आगीशी मस्ती, दाढी मिशी पेटली

मुंबई : बातमी आहे एका (Viral Video) वायरल व्हीडिओची. एक तरुण आपल्या मित्रांना आगीशी खेळ करून दाखवत होता. त्याचे मित्र हा सगळा प्रकार पाहत होते. पण त्याचा हा खेळ फसला आणि हा चांगलाच भाजला, असं काय घडलं या तरुणासोबत चला पाहूयात. (viral polkhol fact check young man fun with fire)

या व्हीडिओत बघा एक व्यक्ती आपल्या मित्रांना जीवघेणा खेळ दाखवतोय. याची आगीशी मस्ती सुरू आहे. यानं हातात ज्वलनशील वस्तू धरलीय आणि तोंडात रॉकेलची चूळ भरलीय. भररस्त्यावर हा मित्रांना आगीशी खेळ करून दाखवतोय. मित्रही याचा हा जीवघेणा खेळ मोठ्या आवडीनं पाहतायत. 

मित्र याला प्रोत्साहन देत असल्यामुळे हा आणखीनंच चेकाळला. बघता बघता त्याने हातातली पेटती वस्तू तोंडाजवळ आणली. तोंडात भरलेली रॉकेलची चूळ या पेटत्या वस्तूवर फेकली. त्यामुळे जोरात आगीचा भडका उडाला. 

आता पुन्हा एकदा पहा. आगीचा भडका उडाला. याच्या चेहऱ्याला आग लागली. आगीत याचं तोंड तर भाजलं. सोबतच अख्खी दाढी, मिशी जळून गेली.  हा सगळा जीवघेणा थरार सुरू असताना आजूबाजूचे मित्र याच्याकडे बघत राहिले.

खेर एक जण पुढे धावत आला. पण त्यालाही आग विझवण्यात यश आलं नाही. अखेर त्याच व्यक्तीनं कशीबशी आग आटोक्याक आणत स्वतःचा जीव वाचवला. पण या जीवघेण्या खेळात याचं तोंड चांगलंच भाजलं. आगीशी मस्ती करणं याच्या अंगलट आलं. हा व्हीडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय.  त्यामुळे अशी जीवघेणी मस्ती करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा.