'थांब थांब थांब...', विमान उड्डाण करत असतानाच रन-वेवर आलं दुसरं विमान; अधिकारी ओरडत राहिला अन् अखेर....; थरार कॅमेऱ्यात कैद

Viral Video: लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी उड्डाण करत असताना गोन्झागा विद्यापीठाच्या पुरुष बास्केटबॉल संघाला घेऊन जाणाऱ्या विमानाने धावपट्टी जवळजवळ ओलांडली.  

शिवराज यादव | Updated: Dec 31, 2024, 05:22 PM IST
'थांब थांब थांब...', विमान उड्डाण करत असतानाच रन-वेवर आलं दुसरं विमान; अधिकारी ओरडत राहिला अन् अखेर....; थरार कॅमेऱ्यात कैद  title=

Viral Video: लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. वॉशिंग्टनच्या गोन्झागा विद्यापीठाच्या पुरुष बास्केटबॉल संघाला घेऊन जाणारं खासगी विमान एका प्रवासी विमानाला धडक देतं का काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र हवाई वाहतूक नियंत्रकाने त्वरीत हस्तक्षेप केल्याने ही दुर्घटना टळली. बास्केटबॉल संघाला घेऊन जाणारं विमान धोकादायकपणे उड्डाण करत असलेल्या दुसऱ्या विमानाच्या धावपट्टीच्या अगदी जवळ आल्यानंतर अधिकारी "थांबा, थांबा, थांबा" असा आदेश देताना ऐकू येत आहे. 

शुक्रवारी घडलेल्या या घटनेची फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) चौकशी सुरू केली आहे. "एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सनी की लाइम एअर फ्लाइट 563 ला (Key Lime Air Flight 563) लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टी ओलांडताना कमी अंतर ठेवण्याचे निर्देश दिले होते. कारण त्यावेळी दुसरे विमान धावपट्टीवरून उड्डाण करत होते. जेव्हा Embraer E135 विमान  होल्ड बार ओलांडण्यासाठी पुढे गेले तेव्हा हवाई वाहतूक नियंत्रकांनी वैमानिकांना थांबण्यास सांगितलं. जेटने रनवे ओलांडला नाही," असं एफएएने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. 

ही संपूर्ण घटना विमान-स्पॉटिंग लाइव्हस्ट्रीमवर कैद झाली आहे. ज्यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलर आपल्या चीमला विमानावा “थांबा, थांबा, थांबा” असं सांगत असल्याचा ऑडिओ कैद झाला आहे. 

यानंतर उड्डाण ताबडतोब थांबलं, आणि नंतर काही क्षणांनी पुढे गेलं. ते वॉशिंग्टनमधील स्पोकेन येथून लॉस एंजेलिसला येत होते. विद्यापीठाने या घटनेची दखल घेत सांगितलं आहे की, "विमानात बसलेल्या आमच्या टीमच्या सदस्यांना असं काही घडल्याची कल्पा नव्हती. आम्हा सर्वांसाठी ही घटना सुरक्षितपणे संपली याबद्दल आम्ही आभारी आहोत".

डेल्टाच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्या विमानांना कोणतीही समस्या नाही. “डेल्टा फ्लाइट 471 ने नेहमीप्रमाणे उड्डाण केलं आणि आम्हाला या फ्लाइटबाबत FAA कडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. आम्ही विमान वाहतूक अधिकाऱ्यांना त्यांच्या तपासात सहकार्य करत आहोत," असं एअरलाइनने ईमेलमध्ये म्हटले आहे. लाइम एअरने ही घटना कशी घडली यावर भाष्य केलेलं नाही.