Fact Check : मुलांना कारमध्ये बसवताय? हा व्हीडिओ पाहा आणि खबरदारी घ्या

हा व्हीडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही मुलांना गाडीमध्ये बसवण्याचं धाडस करणार नाहीत. एक छोटीसी चूक या मुलाच्या जीवावर बेतू शकली असती.

Updated: Aug 10, 2022, 09:13 PM IST
Fact Check : मुलांना कारमध्ये बसवताय?  हा व्हीडिओ पाहा आणि खबरदारी घ्या title=

Viral Video : एक असा व्हीडिओ दाखवतोय (Viral Video) तो पाहुन तुम्ही मुलांना गाडीत बसवण्याची (Van) हिंमत करणार नाही. हा व्हीडिओ पाहा आणि सावध व्हा. कारण तुमच्यासोबतची असा प्रकार घडू शकतो. असं काय घडलंय या मुलासोबत. चला पाहुयात. हा व्हीडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही मुलांना गाडीमध्ये बसवण्याचं धाडस करणार नाहीत. एक छोटीसी चूक या मुलाच्या जीवावर बेतू शकली असती. आता या गाडीकडे निरखून बघा. ही गाडी सिग्नलवर थांबलेली दिसतेय. दरवाज्याची काच उघडी असल्याने एक मुलगा बाहेर डोकावून बघत असतो. (fact check viral polkhol car door fell boy know what false what true)

हे सगळं सुरू असताना ड्रायव्हरचं याकडे लक्ष नसावं.  त्यानं सिग्नल सुटताच वेगानं गाडी पुढे नेली आणि या दरवाज्यातून बाहेर डोकावून पाहत असणारा हा मुलगा खाली पडतो. आता पुन्हा एकदा पाहा. गाडीतून मुलगा बाहेर पडला हे ड्रायव्हरला कळलंच नाही. तो गाडी सुस्साट वेगानं घेऊन निघून गेला. यावेळी मागून येणा-या गाड्यांचा वेग कमी होता म्हणून मोठा अनर्थ टळला.

मागून आलेल्यांनी मुलगा गाडीतून पडलाय हे पाहून गाड्या थांबवल्या. या मुलाला आधी उचललं. या मुलाचं नशीब बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. पण, मुलांना गाडीत बसवताना काळजी घ्यायला हवी. 

मुलांना गाडीत बसवताना दरवाजे, काचा लॉक करा. दरवाजे लॉक आहेत ना याची एकदा खात्री करा शक्यतो मुलांना दरवाज्याच्या बाजूला बसवू नका. हा व्हिडिओ आपल्या देशातील नाहीये. पण, अशी चूक तुमच्याकडूनही होऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. आणि मुलांना गाडीत बसवताना खबरदारी घ्या.