Viral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा

Viral News : पतीने पत्नीची सी सेक्शन डिलिव्हरी पाहिल्यानंतर त्याला गंभीर आजाराची लागण झाल्याचा दावा त्याने केला आहे. एवढंच नाही तर त्याने हॉस्पिटवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Sep 18, 2023, 12:45 PM IST
Viral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा title=
Viral News man gets scared and trouble Serious mental illness after seeing wife c section baby delivery triggered sues hospital Trending News

Trending News : आजकाल पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी पतीला लेबर रुममध्ये राहण्याची परवानगी हॉस्पिटल देतात. या आनंदाचा क्षणाचा आणि पत्नीच्या वेदनांची जाणिव होण्यासाठी हॉस्पिटल अशा प्रकारची परवानगी देतात. पण एका हॉस्पिटलला ही परवानगी देणं महागात पडली आहे. सोशल मीडियावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये पत्नीची सी सेक्शन प्रसूती पाहून त्याला गंभीर आजार झाल्याचा दावा त्याने केला आहे. (Viral News man gets scared and trouble Serious mental illness after seeing wife c section baby delivery triggered sues hospital Trending News)

झालं असं की, ऑस्ट्रेलियतील एका व्यक्तीने असं सांगितलं की, त्याच्या पत्नीने जानेवारी 2018 मध्ये मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्याने हॉस्पिटलवर अजब दावा केला आहे. त्याच्या पत्नीची प्रसूती रॉयल वुमेन्स हॉस्पिटलमध्ये झाली. पत्नीच्या सी सेक्शन प्रसूतीच्या वेळी त्याला लेब रुममध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. ही प्रसूती पाहिल्यानंतर त्याच्या मनावर धक्का बसला असून त्याला गंभीर मानसिक आजार झाल्याचा दावा त्याने केला आहे. 

एवढंच नाही तर मानसिक तणावामुळे आपलं लग्न मोडल्याचंही त्याने तक्रार केली आहे. त्याच म्हणं आहे की, प्रसूतीच्या वेळी त्याला पत्नीच्या अंतर्गत अवयव दिसले होते. शिवाय शरीरातून खूप रक्त बाहेर पडलं ते पाहून त्याचं मानसिक स्थिती ढासळली असा त्याचा दावा आहे. 

दरम्यान रुग्णालयाने या व्यक्तीचा दावा फेटाळून लावला आहे. हे प्रकरण कोर्टात गेलं असून न्यायालयानेही या व्यक्तीची बाजू ऐकून घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्या व्यक्तीची आरोग्याची तपासणी करण्यात आली त्यात त्याला फारसा मानसिक ताण नसल्याचं समोर आलं. अनिल कोप्पुला असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याने हॉस्पिटलवर 72 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा दावा ठोकला आहे. दरम्यान या व्यक्तीने आजाराच्या आधारावर तो खटला दाखल केला आहे त्यानुसार त्याचं काहीही आर्थिक नुकसान झालं नसून त्याला कुठलाही गंभीर आजार नसल्याचं कोर्टाने सांगितलं आहे.