Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, 'त्या' व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग...

Prank Video : आपण प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी नातेवाईकांसोबत किंवा शाळा, कॉलेजमधील मित्रमैत्रीणींसोबत आपण प्रँक केला आहे. पण हे ऐकलं आहे की, प्रँक केल्यामुळे कोणाच्या जीवावर बेतलं...एका धक्कादायक व्हिडीओने जगात खळबळ माजली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Apr 8, 2023, 03:42 PM IST
Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, 'त्या' व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग... title=
trending video man did not like to be pranked than shot youtuber Shocking prank video viral on Social media google trends news

Danger prank video : सोशल मीडिया हा सहज रित्या पैसे कमवण्याचं एक माध्यम झालं आहे. त्यामुळे आजची तरुण पिढी यावर खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर प्रसिद्धीसोबत पैसा हे दोन्ही गोष्टी मिळतात. सोशल मीडियावर तुमचं फॉलोव्हर्स जास्त असल्यास तुम्हाला व्हिडीओनुसार पैसे दिले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर आपल्याला ट्रेंडिंग गाण्यावर, विषयावरचे भरमसाठ व्हिडीओ पाहिला मिळतात. काही लोक फक्त प्रँक व्हिडीओवरही आपलं कमाई करतात. 

खरं आपण प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या आयुष्यात कोणातरी सोबत प्रँक केलेला असतो. नातेवाईक असो किंवा शाळा, कॉलेजमधील मित्र मैत्रीणी अगदी ऑफिसमधील सहकार्याचाही आपण प्रँक केले आहेत. प्रँक करणे हा एक गंमतीचा भाग आहे. एम टीव्ही बकरा हा टीव्ही शो आठवतो तुम्हाला. हा देखील असाच एक प्रँकवर आधारीत होता. ज्यात सर्वसामान्यांपैकी कोणा तरी पकडायचं आणि त्याचासोबत प्रँक करायचं...

पण हे प्रँक सगळ्यांचं आवडेल असं नाही. अनेक वेळा अशाप्रकारच्या प्रँकमुळे लोक नाराज होतात. काही लोक त्याला गंमतीत घेतात. पण काही लोकांना अशा गोष्टी खूप मनाला लागतात. एका व्यक्तीला प्रँक करणे जीवावर बेतल आहे, हो जीवावर... 

प्रँक करणं जीवावर बेतलं...

झालं असं की, एक यू्ट्यूबवर प्रँक व्हिडीओचं चॅनल चालवतं. त्यामुळे दिवसाढवळ्या एका मॉलमध्ये तो एका व्यक्तीसोबत प्रँक करायला गेला. त्याचा एक सहकारी दूरुन हे सगळं कॅमेऱ्यात कैद करत होता. पण झालं उलटच त्या व्यक्तीला प्रँक केल्यामुळे राग आला आणि त्याने यू्ट्यूबवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  (trending video man did not like to be pranked than shot youtuber Shocking prank video viral on Social media google trends news )

कुठे घडली घटना?

अमेरिकेतील व्हर्जिनियामधील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गोळीच्या आवाजानंतर तिथे बदुंकधारी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण गोळी मारतानाचा कुठलाही व्हिडीओ समोर आला नाही. पण घटनेनंतरचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॅनर कुक असं त्या यूट्यूबरचं नाव असून त्याचावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तो क्लासिफाइड गून्स नावाचं स्वत:चं चॅनल चालवतो. दरम्यान पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. तर युट्युबर टॅनर स्थानिक माध्यमांशी बोलताना झालेल्या घटनसंदर्भात सांगितलं. तो म्हणाला की, ''मी फक्त प्रँक करत होतो मात्र त्याने ते चुकीच्या पद्धतीने घेतलं आणि माझ्यावर गोळी झाडली. '' घटनेनंतर काही व्हिडीओ @VAhiphopandnewz या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलं.