तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 'हा' आकडा असेल तर मिळणार नाही Job, कंपनीची विचित्र अट

कंपनीत नोकरीची संधी, पण त्यासाठी शैक्षणिक पात्रतेची नाही तर ही आहे अट

Updated: Sep 26, 2022, 09:17 PM IST
तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 'हा' आकडा असेल तर मिळणार नाही Job, कंपनीची विचित्र अट title=

Trending News : नोकरीच्या जाहाराती आपण अनेकवेळा पाहात असतो. पेपरमध्ये किंवा टीव्हीवर विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी जाहीराती (Vacancy Advertisement) प्रसिद्ध होत असतात. सरकारी असो किंवा खासगी कंपनीतील नोकरी असो, यासाठी विविध अटी या जाहीरातीत दिलेल्या असतात. तुमची शैक्षणिक पात्रता, वय, तुम्ही केलेले वेगवेगळे कोर्स, त्या योग्यतेनुसार नोकरी दिली जाते. पण सध्या नोकरीची एक जाहीरात चांगलीच चर्चेत आली आहे. यात शैक्षणिक पात्रता किंवा वयाची मर्यादा गरजेची नुसार एक विचित्र अट कंपनीने ठेवली आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांमध्ये चांगलाच संताप पसरला आहे.

काय आहे नोकरीची जाहीरात?
एका कंपनीच्या मालकाने नोकरी देण्याची घोषणा केली आहे. पण या कंपनीत अशा लोकांना नोकरी मिळणार नाही ज्यांच्या मोबाईल फोन (Mobile Phone) नंबरचा पाचवा आकडा पाच आहे. या विचित्र अटीमुळे नोकरी शोधणाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

ही जाहीरात चीनमधली (China) आहे. इथं एका खासगी कंपनीच्या मालकाने इंटरव्ह्यूसाठी (Interview) येणाऱ्या उमेदवारांसमोर (Candidate) अट ठेवली आहे. तुम्हाला नोकरी हवी असेल आणि तुमच्या मोबाईल फोन नंबरमध्ये पाचवा आकडा पाच असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलावा लागेल. या कंपनीचा मालक प्रचंड अंधश्रद्धाळू (Superstitious) आहे. फोन नंबरमध्ये पाचवा आकडा पाच असेल तर कंपनीसाठी नुकसानदायक ठरू शकतो, असं त्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या मालकाने अशी विचित्र अट टाकली आहे.

वास्तविक या विचित्र अटीचा नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या शैक्षणिक किंवा शारिरीक पात्रेतेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी या विचित्र अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. 21 व्या शतकातही अंधश्रद्धेला (Superstition) खतपाणी घालत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. तर एखाद्या ज्योतिषालाच नोकरीला का ठेवत नाही, असा सवलाही काहीजणांनी उपस्थित केला आहे.

ज्योतिष तज्ज्ञांच्यामते (Astrologer) चीनमध्ये अनेक कंपन्या पारंपारिक ज्योतिषशास्त्राशी प्रभावित आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मोबाईल फोन नंबरचा पाचवा आकडा पाच असल्यास कर्मचाऱ्यांचं सीनिअर्सशी भांडण होऊ शकतं. हे कंपनीसाठी लाभदायक नसल्याचं ज्योतिष तज्ज्ञांचं मत आहे.