Trending News : 29 वर्षांची आई आणि 22 वर्षांची मुलगी, सोशल मीडियावर मायलेकीची चर्चा

Viral News : सोशल मीडिया दोन तरुणींची जोरदार चर्चा सुरु आहे. मायलेकी असलेल्या या दोघी अगदी जुळ्या बहिणी वाटतात. काय आहे नेमकं यांचं नातं?

नेहा चौधरी | Updated: Jan 20, 2024, 01:12 PM IST
Trending News : 29 वर्षांची आई आणि 22 वर्षांची मुलगी, सोशल मीडियावर मायलेकीची चर्चा  title=
Trending News A 29 year old mother and a 22 year old daughter social media Viral News

Mother-Daughter Duo : आपल्या आजूबाजूला आणि आता तर मोबाईलवरील सोशल मीडियाच्या जगात माय लेकीच्या अशा जोड्या दिसतात. ज्यात आईचं सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. त्यात मुलगीही तरुण असेल तर मग तर बोलायलाच नको. सध्या सिनेसृष्टीत एक मायलेकीची जोडी आहे त्या दोघींचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ होता. श्वेता तिवारी आणि तिची मुलगी चहल. यादोघी मायलेकी नाही तर बहिणी वाटतात. अशाच एका मायलेकीची सध्या सोशल मीडियावर होते आहे. आई 29 वर्षांची तर लेक 22 वर्षांची आहे, हे कसं काय होऊ शकतं. या दोघींना सोशल मीडियावर जुळ्या बहिणी म्हणून म्हटलं जातं आहे. (Trending News A 29 year old mother and a 22 year old daughter social media Viral News )

काही आई आणि मुलींच्या वयात कमी फरक असल्याचे अनेकदा समोर आलं आहे. यामागील कारणं ही वेगवेगळी असतात. मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेली ही मायलेकीची जोडीचं सत्य समजल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या दोघी मायलेकीमध्ये 7 वर्षांचा फरक आहे.

काय आहे नेमकं यांचं नातं?

 या दोघी जुळ्या बहिणी वाटतात पण सवाना ही टिझीची सावत्र आई आहे. सवाना ही हेअरस्टाइलिस्टच्या कामासाठी क्रिसच्या ब्युटी सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी एकत्र काम करता करता सवाना आणि ख्रिस प्रेमात पडेल आणि त्यांनी लग्न केलं. सवाना आणि ख्रिस दोघेही त्यांच्या पूर्वीच्या नातेसंबंधांवर खूष नव्हते. या अशात या दोघांची कामानिमित्त भेट झाली. त्या दोघांचा पुन्हा नात्यामध्ये पडण्याचा काही विचार नव्हता. पण आपण प्रेमात कधी पडतो हे अनेक वेळा आपल्यालाही माहिती नसतं. या दोघांमध्येही 16 वर्षांच्या फरक असूनही त्यांनी आयुष्याला दुसरा चान्स देण्याचं ठरवलं आणि लग्न केलं. खरं तर ख्रिसला आधीपासून एक मुलगी होती. ख्रिसची मुलगी टिझी आणि नवीन बायकोच्या वयातील फरक यामुळे सवाना घाबरली होती. 

सवाना म्हणाली की, 'सुरुवातीला टिझीला आमचं नातं अजिबात आवडले नाही.' एवढंच नाही तर सोशल मीडियावर मला लोकांकडून टोमणे आणि तिच्या आरोपांना उत्तर द्यावे लागले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने आपल्या सावत्र मुलीवर प्रेम व्यक्त करणे थांबवलं नाही. 

कपड्यांचा ब्रँडही सुरू केला

काही वेळ गेल्यानंतर या दोघींमध्ये मैत्रीचं नात जुळलं गेलं. विशेष म्हणजे या दोघींचे अनेक डान्स व्हिडीओ TikTok वर पाहिला मिळतात. एवढंच नाही तर ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सवानाने एका व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, 'आता दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत.' या दोघी मायलेकीने मिळून कपड्यांचा एक ब्रँडही सुरू केला आहे. एका व्हिडीओमध्ये सवाना हिरव्या रंगाचा स्वेटर घातलेली दिसली होती ज्यावर 'स्टेप-मामा' लिहिलं दिसत आहे.