जगाला धडकी भरवणारी बातमी; चीनमध्ये एका दिवसात 3 कोटी 70 लाख कोरोना रुग्ण

 चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आणि जगाची चिंता वाढवणारी आहे. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. सरकारी आरोग्य विभागाची कागदपत्रं लीक झाल्यानं हा आकडा समोर आला आहे. 

Updated: Dec 25, 2022, 07:55 PM IST
जगाला धडकी भरवणारी बातमी; चीनमध्ये एका दिवसात 3 कोटी 70 लाख कोरोना रुग्ण title=

china coronavirus again : चीनमध्ये कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट झाला आहे. एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी तर 20 दिवसात तब्बल 24 कोटी कोरोना रुग्णांची नोंद चीनमध्ये झाली आहे. ही संख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या दुप्पट तर उत्तरप्रदेशच्या लोकसंख्येपेक्षा काही कोटींनी जास्त आहे. हाँगकाँगमधल्या माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. या आडकेवारीमुळे जगाला धडकी भरली आहे(china coronavirus again).  चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आणि जगाची चिंता वाढवणारी आहे. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. सरकारी आरोग्य विभागाची कागदपत्रं लीक झाल्यानं हा आकडा समोर आला आहे. 

चीन मधील सरकारी आरोग्य विभागाची कागदपत्रं लीक झाल्यानं उघड झाली आकडेवारी

झीरो कोव्हिड पॉलिसी शिथील केल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भयावह बनत गेली.  पुढच्या 3 महिन्यात 60% नागरिकांना कोरोना होणार असल्याची भीती वर्तवण्यात येतेय. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बैठकीत कोरोनासंदर्भातली आकडेवारी ठेवण्यात आली होती. 20 मिनिटं चाललेल्या या बैठकीतली कागदपत्रं लीक झालीत.  लोकांपर्यंत सत्य समोर येण्यासाठी कोण्या अधिका-याने ही माहिती लीक केल्याचा आरोप आहे. एका ब्रिटीश दाव्यानुसार चीनमध्ये रोज 5 हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय, तर दरदिवशी 10 लाखांहून अधिक लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत.

कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीननं पुन्हा लपवाछपवी सुरु केली

कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीननं पुन्हा लपवाछपवी सुरु केलीये. यापुढे चीनच्या आरोग्यविभागाला रुग्णसंख्या जाहीर करता येणार नाहीत असा निर्णय चिनी सरकारनं घेतलाय. चीनच्या रुग्णसंख्येची माहिती ही रोग नियंत्रण केंद्र म्हणजेच सीडीसीकडून जाहीर केली जाईल असं सांगण्यात आलंय. चीनच्या आरोग्य विभागाचा एक अहवाल लीक झाला होता. ज्यात एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर चीनी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. 
अशी आहे चीनमधील कोरोना रुग्णांची आकडेवारी

चीनमध्ये एका दिवसात तब्बल 3 कोटी 70 लाख कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर या काळात तब्बल 24 कोटी 80 लाख लोकांना चीनमध्ये कोरोनासंसर्ग झालाय. सिचुआन, बीजिंग, शांघाय, शेडोंग प्रांतात कोरोनाचा सर्वात मोठा स्फोट झालाय. छिंगदाओ शहरात तर दररोज 5 लाख रुग्ण मिळतायत. 18 आणि 19 डिसेंबरला चीनमध्ये 11 लाख लोकांच्या मृत्यूपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आलेत. बीजिंगमध्ये 60 तर शांघायमध्ये 40 नव्या दफनभूमी तयार करण्यात आल्यात.
जगामध्ये एका दिवसात सर्वाधिक लोकांना एकाच दिवशी झालेल्या संसर्गाचा विक्रम या चीनमधील करोनाच्या लाटेने मोडला

जगामध्ये एका दिवसात सर्वाधिक लोकांना एकाच दिवशी झालेल्या संसर्गाचा विक्रम या चीनमधील करोनाच्या लाटेने मोडीत काढलाय. ओमिक्रॉनच्या BF.7 या सर्वात शक्तिशाली व्हेरिएंटमुळे चीनचं कंबरडं मोडलंय. चीनमधल्या कोरोनाच्या महाभयंकर लाटेचा परिणाम जपान आणि हाँगकाँगवर झालाय, तिथेही दिवसाला लाखांच्यावर रुग्ण मिळालायला लागलेत. तर दुसरीकडे जगात नाचक्की होऊ लागल्यानं चीनच्या जिनपिंग सरकारनं कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर करणं बंद केलंय. 20 डिसेंबरच्या पुढची चीनमधल्या रुग्णांची आकडेवारी अजून अपडेट कऱण्यात आलेली नाही. चीनच्या वुहान लॅबमधून पहिल्यांदा जगभरात कोरोनाचा प्रसार झाला. आणि आता चीनमध्ये दिवसाला कोट्यवधी रुग्ण मिळाल्याची नोंद झालीय. कोरोनाच्या झटक्यातून जग आता कुठे सावरत असताना पुन्हा चीननं जगाचं टेन्शन वाढवल आहे.