Baby Laughing Viral Viral: 'मुलं ही देवाघरची फुलं' असं म्हटलं जातं. कारण त्यांच्या निष्पाप कृतीतून ते वारंवार दिसून येतं. त्यांच्या निष्पाप कृती पाहिल्यानंतर आपल्याही आत्मिक आनंद मिळतो. त्यामुळे लहान मुलांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात मुलानं दिलेली प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडीओत मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. बघता बघता नेटकऱ्यांनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत 1.2 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर लाखो लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे आणि हजारो लोकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. .
या व्हिडीओमध्ये एक लहान बाळ सोफ्यावर बसलेले दिसत आहे. त्याच्या वडिलांनी समोर ठेवलेला कागद फाडताच ते बाळ निरागस प्रतिक्रिया देते. मुलाचे वर्तन कसे होते हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा.
वडिलांनी कागद फाडताच लहान बाळ जोरात हसायला लागते. हा व्हिडीओ पाहून अनेकजण मुलाच्या क्यूटनेसचे चाहते झाले आहेत. वडिलांनी जितक्या वेळा पेपर फाडला, तितक्या वेळा बाळ हसताना दिसत आहे. हा ट्रेंडिंग व्हिडिओ पाहून अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत.