स्टीव्ह जॉब्सने वापरलेल्या प्रोटोटाइप लिलाव; 'इतक्या' कोटींना विकला गेला

हा प्रोटोटाइप तब्बल 46 वर्षे जुना आहे

Updated: Aug 21, 2022, 06:10 PM IST
स्टीव्ह जॉब्सने वापरलेल्या प्रोटोटाइप लिलाव; 'इतक्या' कोटींना विकला गेला title=
(फोटो सौजन्य - @RRAuction)

अ‍ॅपलच्या (Apple) उत्पादनांची लोकांमध्ये खूप क्रेझ आहे. अ‍ॅपल या ब्रँडची उत्पादनेही अनेकांना आवडतात. अलीकडेच, 1976 सालचा अ‍ॅपल कॉम्प्युटर तगड्या किमतीमध्ये विकला गेला आहे. आता त्याचा प्रोटोटाइपही (prototype) खूप महाग विकला गेला आहे. Apple-1 प्रोटोटाइप 677,196 डॉलर (अंदाजे 5.5 कोटी रुपये) मध्ये विकला गेला आहे.

या कॉम्प्युटर प्रोटोटाइपची खास गोष्ट म्हणजे याचा वापर अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी तो विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. एका कलेक्टरने तो 677,196 डॉलरमध्ये लिलावात खरेदी केला आहे. दरम्यान तो खरेदी करणाऱ्या व्यक्तीने नाव न सांगण्याची अट ठेवली आहे.

या प्रोटोटाइपचा वापर स्टीव्ह जॉब्स यांनी 1976 मध्ये कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू येथील बाईट शॉपचे मालक पॉल टेरेल यांना कॉम्प्युटरचे प्रात्यक्षिक  दाखवण्यासाठी केला होता. हे जगातील पहिल्या वैयक्तिक कॉम्प्युटर दुकानांपैकी एक होते.

आरआर ऑक्शन हाऊसमध्येच या कॉम्प्युटर प्रोटोटाइपचा लिलाव करण्यात आला होता. हे अ‍ॅपल डिव्हाइस स्टीव्ह वोझ्नियाक, पॅटी जॉब्स आणि डॅनियल कोटके यांच्यासह स्टीव्ह जॉब्सने विकसित केलेल्या 200 युनिट्सपैकी एक आहे. Apple-1 चे उत्पादन थांबण्यापूर्वी केवळ 200 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. जेव्हा ते लॉन्च केले गेले तेव्हा त्याची किंमत  666.66 डॉलर (सुमारे 49,000 रुपये) ठेवण्यात आली होती.

प्रोटोटाइप म्हणजे काय?

प्रोटोटाइप म्हणजे   चाचणी घेण्यासाठी तयार केलेल्या उत्पादनाचा नमुना किंवा मॉडेल. हा शब्द डिझाइन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगसह विविध संदर्भांमध्ये वापरला जाणारा शब्द आहे.