Sperm Donor Scam: एकदा-दोनदा नाही तर तब्बल 60 वेळा स्पर्म डोनेट, पैशांसाठी अशी करत होता फसवणूक

Sperm Donor Scam: ऑस्ट्रेलियातील स्पर्म डोनेशनच्या (Sperm Donation Rules) नियमांनूसार, एकाच वेळी फक्त एकाच डॉनरचे स्पर्म वापरता येऊ शकतात. पण या स्पर्म डॉनरनं मात्र आपली ओळख लपवली आणि आपल्या नावांची अदलाबदली करून मुलांच्या पालकांना स्पर्म डोनेट केले होते. 

Updated: Feb 24, 2023, 06:48 PM IST
Sperm Donor Scam: एकदा-दोनदा नाही तर तब्बल 60 वेळा स्पर्म डोनेट, पैशांसाठी अशी करत होता फसवणूक title=

Sperm Donor: आपल्या जगात अशी अनेक आश्चर्य आहेत जी वाचून, ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक घटना ही ऑस्ट्रेलियामध्ये (Australia Based Sperm Donar) घडली आहे. एका स्पर्म डॉनरची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या स्पर्म डॉनरच्या मदतीनं 60 मुलांना जन्म दिला आणि त्यानंतर ती सर्व मुलं ही एकसारखीच निघाली. पण नक्की असं काय प्रकरणं झालं की हा स्पर्म डॉनर चर्चेत आला आहे? 2014 साली विकी डॉनर (Vicky Donar) हा चित्रपट आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. यात एका स्पर्म डॉनरची प्रेम कहाणी होती. आता स्पर्म डॉनरची संख्या वाढू लागली आहे. भारतातही आता स्पर्म डोनेट करणं फार सामान्य मानलं जातं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. सोशल मीडियाही यात महत्त्वाची भुमिका निभावतो आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, हा स्पर्म डॉनर वेगवेगळ्या नावानं स्पर्म डोनेट (Sperm Donate) करायचा. सध्या हा स्पर्म डॉनर भलताच चर्चेत आला आहे. त्याच कारणं असं की या स्पर्म डॉलरनं 60 मुलांना जन्म दिला आहे आणि ही सर्व 60 मुलं दिसायला सारखीच आहेत. या सर्व मुलांचा बाप हा एकच आहे. त्या सर्वच मुलांचा चेहरा एकसारखाच आहे त्यामुळे त्या मुलांच्या पालकांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. 

नक्की प्रकरण काय? 

ऑस्ट्रेलियातील स्पर्म डोनेशनच्या (Sperm Donation Rules) नियमांनूसार, एकाच वेळी फक्त एकाच डॉनरचे स्पर्म वापरता येऊ शकतात. पण या स्पर्म डॉनरनं मात्र आपली ओळख लपवली आणि आपल्या नावांची अदलाबदली करून मुलांच्या पालकांना स्पर्म डोनेट केले होते. अशा प्रकारे या मुलांच्या आईवडिलांना संशय आल्यामुळे या स्पर्म डॉनरविरूद्ध तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाला. या स्पर्म डॉनरची ओळख काढायला सुरूवात केली आणि मग त्यांचे भांडे फुटले. 

कोण होता हा स्पर्म डॉनर? 

LGBTQ+ समूदायासाठी हा स्पर्म डॉनर स्पर्म डॉनेट करायचा. त्यातून त्यानं आपल्या बिझनेस वाढवावा म्हणून स्पर्मची विक्री करायला सुरूवात केली परंतु आपला बिझनेस वाढवावा या दृष्टीनं त्यानं आपली नावं बदलून स्पर्म विकायला सुरूवात केली त्यामुळे आपला फायदा पाहण्यासाठी त्यानं हा असा मार्ग अवलंबवला आणि लपूनछपून कारभार सुरू ठेवला परंतु त्याचा हा खोटारडेपणा फार काही टिकला नाही आणि त्याचा खरा मुखवटा सगळ्यांसमोर आलाच.