मुंबई: सोशल मीडियावर वेगवेगऴे चॅलेंज सतत व्हायरल होत असतात. कधी साडी चॅलेंज तर कधी नथीचं चॅलेंज तर कधी डे नुसार चॅलेंजर सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कीकी चॅलेंज खूप फेमस झालं होतं. आता पुन्हा एक नवीन चॅलेंज सोशल मीडियावर आले आहेत. या चॅलेंजचं नाव आहे मिल्क क्रेट चॅलेंज सध्या ट्रेन्ड होत आहे.
हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अनेक तरुण आपली हाडं मोडून घेण्यासाठीही तयार असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामध्ये प्लास्टिक क्रेटपासून उंच पिरॅमिड तयार केले जातात. त्यावर बॅलन्स करून त्यावर चालत हे पिरॅमिड पूर्ण करायचं असतं. हे पिरॅमिड चढता तर येतं मात्र उतरताना तोल जातो आणि खाली कोसळायला होतं. सध्या हे चॅलेंज सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तरुण प्लास्टिकने तयार केलेल्या क्रेटवर चढतो. त्यानंतर उतरताना त्याचा तोल जातो आणि कंबरेवर खाली जोरात कोसळतो. हा तरुण जखमी पण झाला आणि त्याचं चॅलेंजही अपूर्ण राहिलं.
तुम्ही जर हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या विचारात असाल तर थांबा... कारण हे चॅलेंज पूर्ण करताना तोल गेला आणि खाली कोसळलात तर तुमचं चॅलेंज अपूर्ण तर राहिलंच पण जखमी व्हाल आणि हाड मोडून घेण्याची लक्षाणं कशाला करायची. त्यामुळे जरा हे सावधगिरीनंच चॅलेंज पूर्ण करा. अनेक तरुणांनी सोशल मीडियावर हे चॅलेंज करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला केनेथ वाडेल याने मिल्क क्रेटच्या पिरॅमिडवर चढण्याचं चॅलेंज केलं आणि त्यानंतर सर्वांनाच हे चॅलेंज करायची हुकी आली. सोशल मीडियावर जो तो हे चॅलेंजर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.तर डॉक्टरांनी हे चॅलेंजर खतरनाक असल्याचं म्हटलं आहे. हे चॅलेंजर पूर्ण करताना जे तरुण खाली कोसळत आहेत त्यांच्या हाडांनाही इजा पोहोचत असल्याचं सांगितलं जात आहे.