माजी British Soldierने घातला सलवार-कमीज आणि स्कार्फ....तालिबान्यांना असा दिला चकमा

कॉमरला उच्च अधिकाऱ्यांनी काही काळ अफगाणिस्तानात राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्याने...

Updated: Aug 25, 2021, 12:39 PM IST
माजी British Soldierने घातला सलवार-कमीज आणि स्कार्फ....तालिबान्यांना असा दिला चकमा title=

काबूल : अफगाणिस्तानावर तालिबानींनी ताब्यात घेतल्यानंतर लोकांनी देश सोडण्यासाठी गर्दी केली. अजूनही काही लोकं पळून जाण्याच्या तयारीत आहेत. ज्यामुळे तालिबान्यांनी काबूल विमानतळाला वेढा घातला. जेनेकरून लोकाना देश सोडून पळून जन्यापसून त्यांना रोखता येईल. परंतु तालिबान्यांच्या इतक्या तयारी नंतरही एक माजी ब्रिटिश सैनिक तालिबान्यांना चकमा देऊन निघून आला.

धोक्यांशी खेळत विमानतळावर पोहोचला

'डेली मेल'च्या अहवालानुसार, 60 वर्षीय माजी ब्रिटिश सैनिक लॉयड कॉमरने (Lloyd Comer, 60) हुशारीने देश बदलण्यासाठी आपले स्वता:चे रूप बदलले आणि धोक्याचा सामना करत काबूल विमानतळावर पोहोचले.

कॉमरला उच्च अधिकाऱ्यांनी काही काळ अफगाणिस्तानात राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि विमानतळावर पोहोचले आणि तेथून ब्रिटिश विमानात चढून अफगाणिस्तान सोडले.

स्थानिक लोकांची लॉईडला मदत

लॉयड कॉमरने काबूल विमानतळावर पोहोचण्यासाठी खूप मेहनक केली. प्रथम त्याने पारंपारिक अफगाणी ड्रेस सलवार-कमीज  (shalwar kameez) घातला, डोक्यावर स्कार्फ बांधला आणि नंतर स्थानिक कारमध्ये विमानतळाकडे रवाना झाले. यासाठी स्थानिक लोकांनीही त्याला मदत केली.

लॉयड ने सांगितले की, त्याने काबूल सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता. कारण जर त्याने परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांचा सल्ला मानला असता, तर आतापर्यंत त्याला तालिबान्यांनी पकडले असते. तो म्हणाला, "मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि माझा जीव वाचवला."

लॉयड कॉमरच्या मते, "तालिबानच्या भीतीमुळे प्रत्येकजण पळून जात होता. मी बाहेर पडण्यासाठी हाय कमिशनशी संपर्क साधला, पण मला काही काळ काबूलमध्ये लपून राहायला सांगितले. परंतु तालिबानी आपल्या शत्रूंना त्यांच्या घराबाहेर काढून किंवा शोधून त्यांना मारत होते. हे मला जेव्हा कळले, तेव्हा माझी भीती आणखी वाढली. यानंतर मी काबूल शहर सोडण्याचा निर्णय घेतला. यासाठी मी माझे रूप देखील बदलले. स्थानिक लोकांकडून वाहनाची व्यवस्था केली आणि चेहरा झाकून काबूल विमानतळाकडे रवाना झाले."

अनेक चेक पोस्टमधून जावे लागले

माजी ब्रिटिश सैनिक लॉयडला विमानतळाकडे जाताना अनेक तालिबान चेकपोस्टचा सामना करावा लागला, पण त्याच्या बुद्धिमत्तेमुळे तो तालिबानी दहशतवाद्यांना चकमा देण्यात यशस्वी झाला. सुमारे तासभर गाडी चालवल्यानंतर तो विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याने सुटकेचा नि: श्वास सोडला. लॉयड म्हणाला, 'लष्करात असल्याने मला अशा परिस्थितींना सामोरे जाण्यास मदत झाली. मी स्वतःला शांत आणि स्थानिक व्यक्तीसारखे दिसण्यासाठी तयार केले. तथापि, मी दु: खी आहे की, मी इतर अफगाणींना मदत करू शकलो नाही.

माजी ब्रिटिश सैनिक लॉयड सी -17 विमानाने थेट आपल्या देशात जाऊ शकत नव्हते. तो प्रथम यूएईला पोहोचला, त्यानंतर तिथून स्पेनला गेला. यानंतर तो आपला देश ब्रिटनला पोहोचू शकला. लॉयड म्हणाले, 'अफगाणिस्तान खूप चांगला देश आहे. मी तिथे बराच वेळ घालवला आहे आणि तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी जे काही शक्य आहे ते करेन. मला माफ करा मी कोणालाही सोबत आणू शकलो नाही.