मुंबई : कोरोना व्हायरसने लोकप्रिय आणि प्रसिद्ध डॉ जितेंद्र राठोड यांच निधन झालं आहे. वेल्समधील अतिदक्षता विभागात एका अनुभवी आणि लोकप्रिय हार्ट सर्जनचा मृत्यू झाला आहे. कार्डिफ येथील युनिर्व्हसिटी हॉस्पिटलमध्ये ६२ वर्षीय डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
राठोड हे रूग्णालयात कार्डिओथोरॅसिक सर्जरीचे स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत होते. कोरोनामुळे मृत्यू झालेले राठोड हे पहिले वेल्समधील आरोग्य कर्मचारी असल्याच सांगण्यात आलं आहे.
राठोड यांनी १९७७ मध्ये मुंबई विश्वविद्यालयातून शिक्षण घेतलं होतं. शिक्षण घेऊन ते ब्रिटनला निघून गेले. अनेक वर्ष त्यांनी राष्ट्रीय स्वास्थ सेवा म्हणजे एनएचएसमध्ये काम केलं.
Jitendra Rathod, Assoc Specialist in Cardio-thoracic Surgery from Univ Hospital Wales, died at the hospital this morning after testing positive for #Covid_19 - this posted now by @CV_UHB pic.twitter.com/0mWtpzy0YO
— Andy Davies (@adavies4) April 6, 2020
कार्डिफ आणि व्हॅले युनिव्हर्सिटी हेल्थ बोर्डाच्या संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या निवेदनात राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. १९९० च्या मध्यापासून त्यांनी कार्डिओथोरॅसिक सर्जरी विभागात काम केले आहे. परदेशात आपल्या सहकारी आणि मित्रपरिवारात डॉ. राठोड हे जितू या नावाने लोकप्रिय होते.
मात्र डॉ. राठोड यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. राठोड यांच्या पश्चात दोन मुलं असल्याची माहिती मिळाली. पब्लिक हेल्थ वेल्सने सांगितले की,'कोरोना व्हायरसची लागण झालेले ३०२ नवी रूग्ण आहेत. कोविड-१९ पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या २७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.