मुंबई : एंजेलिना निकोलाऊ ही २३ वर्षीय मॉडेल पुन्हा चर्चेमध्ये आली आहे.
जगभरात फिरून उंच ठिकाणी फोटो काढण्याचा तिला छंद आहे.
काही दिवसांपूर्वी एंजेलिना निकोलाऊने तिचा प्रियकर इव्हानसोबतचे काही फोटो शेअर केले. इव्हानसोबत एंजेलिना हाँगकाँगमधील सर्वात उंच क्रेनवर चढली. तेथून तिने एक सेल्फी क्लिक केला आहे. हा थरारक सेल्फी पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
इव्हान आणि एंजेलिना कोणत्याही सुरक्षेच्या साधनांचा वापर न करता वर चढले होते. तेथूनच त्यांनी सेल्फी आणि इतर फोटोशूटदेखिल केले आहेत. या ठिकाणचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरदेखील केले आहेत.
गेल्यावर्षी एंजेलिनाने जगातील सर्वात उंच इमारतीवर चढून योगा प्रात्यक्षिकंदेखिल केली आहेत. अशा धाडसी फोटोंमुळेच एंजेलिना अनेकदा चर्चेमध्ये आली होती.