नवी दिल्ली : जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानचे पंतप्रधान म्हणून शिंजो आबे यांना जनतेने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. एकूण ४६५ जागांपैकी ३११ जागांवर विजय मिळवत आबे यांनी मोठी बाजी मारली. या विजयाबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आबे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जपानमध्ये झालेल्या मध्यवधी निवडणूकीसाठी रविवारी मतदान पार पडले. ज्यात आबे यांच्या नेतृत्वाखाली (एलडीएफ) स्पष्ट बहूमत मिळाले. दोन तृतियांश मतांसाठी आबे यांच्या सहकाऱ्यांना ४६५ पैकी ३११ जागांवर विजयी होणे गरजेचे होते.
दरम्यान, आबे जिंकल्याचे समजल्यावर मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छांमध्ये मोदी म्हणतात, माजे प्रिय मित्र @आबेशिंजो यांनी निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवला. त्याबाब आपले अभिनंदन. आपल्यासोबत मी भारत-जपान संबंध अधिक दृढ करू इच्छितो. आबे आणि मोदी यांचे संबंध चांगले राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच आबे यांनी गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमा भाग घेतला होता.
दरम्यान, मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंजो आबे विजयाच्या समीप असल्याचे प्रथम दर्शनी चित्र होतेच. टीबीएएस या खासगी संस्थेने केलेल्या जनमत चाचणीतही हा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आबे यांच्या कॉन्झर्वेटीव्ह आघाडीला एकूण ४६५ पैकी ३११ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जपानमधील आघाडीचे दैनिक 'योमिउरी’ने आपल्या संकेतस्थळावरील वृत्तात आबे हे मोठ्या फरकाने विजयी होण्याची शक्यता असून, ते विजयाच्या समीप असल्याचे म्हटले होते.
Heartiest greetings to my dear friend @AbeShinzo on his big election win. Look forward to further strengthen India-Japan relations with him.
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2017
या वेळी आबे यांना जनतेने दुसऱ्यांदा कौल दिल्यामुळे जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे तसेच, उत्तर कोरीयाबाबत असलेले धोरण अधिक कडक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.