Viral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...

Viral News :  बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल. 

नेहा चौधरी | Updated: Dec 17, 2024, 03:40 PM IST
Viral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं... title=

Mistress Sues Lover Wife : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधातील अनेक घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावर एक विचित्र प्रकरण समोर आलंय. हे प्रकरण म्हणजे अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांचा जुदाई चित्रपट तुम्हाला आठवले. होय, अगदी बरोबर कोर्टासमोर एक विचित्र प्रकरण समोर आलंय. एका महिलेने प्रियकरांच्या पत्नीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. या महिलेचा आरोप आहे की, तिच्या प्रियकराच्या पत्नीने तिच्याकडून तब्बल 1.3 कोटी रुपये घेतले. हे पैसे का घेतले तुम्हाला माहितीये का? तर त्या महिलेने प्रियकराला पत्नीला पैसे दिले कारण तिने नवऱ्याला घटस्फोट द्यावा. पण 1.3 कोटी घेऊनही प्रियकराच्या पत्नीने घटस्फोट दिला आहे. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही घटना चीनमधील आहे. अनिक कपूरच्या भूमिकेत असलेला रिअर लाइफमधील व्यक्तीची ओळख पटलेला नाही पण त्याचं आडनाव हान आहे. त्याच विवाहबाह्य संबंध होते. ऑफिसमध्ये सहकारीच्या प्रेमात तो पडला. 

9 वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर...

चीनच्या फुजियान प्रांतातील शिशी इथे राहणाऱ्या हानने 2013 मध्ये यांगशी लग्न केलं होतं. नंतर, त्याचे ऑफिसमधील महिला सहकारीसोबत प्रेम संबंध सुरु झाले. तिचं नाव शी असं आहे. हान आणि त्याची पत्नी यांग यांना दोन मुली आहेत. पण कहानी इथे थांबत नाही, दुसरीकडे हानची प्रियसीनेही नोव्हेंबर 2022 मध्ये एका मुलाला जन्म दिला.

रिपोर्टनुसार, त्यानंतर शीने हानच्या पत्नीशी संपर्क साधला आणि तिला घटस्फोटासाठी राजी होण्यासाठी खूप प्रयत्न केला. शीने एक करार केला, जर यांगने तिच्या पतीला घटस्फोट देण्याचे मान्य केले तर ती महिला यांगला 1.3 कोटी  रुपये देईल. 

कराराचा भाग म्हणून, शी हिने 2022 च्या मध्याला यांगला 1.3 कोटी दिले. त्यानंतर यांगने हे पैसे तर घेतली पण पतीला घटस्फोट देण्यास नकार दिला, असा रोप शीने कोर्टात केलाय. वर्षभर वाट पाहिल्यानंतर शीने आपले पैसे परत मागायला सुरुवात केली. यांगने पैसे परत करण्यास नकार दिल्याने निराश झालेल्या शीने 1.3 कोटी वसूल करण्यासाठी त्याच्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली. 

न्यायालयाने प्रेयसीचा युक्तिवाद...

चीनच्या शिशी पीपल्स कोर्टाने शी यांच्या बाजूने निकाल देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटलं की शीच्या देयकाने सामाजिक नैतिक मानकांचे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचे उल्लंघन केलंय. कारण ते वैध विवाहात व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने होतं. न्यायालयीन कामकाजादरम्यान हे देखील उघड झालंय की हानने आपल्या पत्नीच्या नकळत शीवर 6 दशलक्ष युआनपेक्षा जास्त खर्च केला होता.