Hindu Muslim Divorce Rate : अलिकडच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. विविध कारणांमुळे अवेक जोडप एकमेकांपासून विभक्त होत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी घटस्फोट घेतल्याचे समोर आले आहे. हिंदू की मुस्लिम? भारतात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधिक घटस्फोट घेतात? याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हसीन जहाँला घटस्फोट दिला आहे. शिखर धवनचाही घटस्फोट झाला आहे. अलीकडेच प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान याने देखील घटस्फोट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. भारतात विविध धर्मातील घटस्फोटाची आकडेवारी समोर आली आहे.
भारताची एकूण लोकसंख्या 140 कोटींहून अधिक आहे. पण 2011 च्या जनगणनेच्या वेळी ही लोकसंख्या 121 कोटी इतकी होती. 2011 च्या लोकसंख्येनुसार हिंदू आणि मुस्लिमांमधील घटस्फोटाचे प्रमाण पाहिले तर मुस्लिम धर्मात घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या आकडेवारीवरुन समोर येते. 1000 पैकी पाच महिला घटस्फोट घेतात. याच आकडेवार हिंदू धर्मात घटस्फोट घेणाऱ्यांचा आकडा जवळपास निम्मा आहे. आकडेवारीची सरासरी पाहिली असता हजार मुस्लिम महिलांमध्ये हे प्रमाण 6.5% आहे. तर हिंदू महिलांमध्ये हे प्रमाण 6.9% इतके आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, 1 लाख मुस्लिम पुरुषांपैकी 1590 पुरुष घटस्फोटित आहेत. तर हिंदूंमध्ये हा आकडा 1470 आहे. महिलांबाबत बोलायचे झाले तर एक लाख मुस्लिम महिलांपैकी 5630 महिला घटस्फोटित आहेत. तर हिंदू महिलांमध्ये हा आकडा 2600 च्या आसपास आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर मुस्लिमांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
भारतात हिंदू किंवा मुस्लीन नाही तर ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मात घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहेत. ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मातील घटस्फोट आणि विभक्त होण्याच्या आकडेवारीबद्दल बोललो तर ते हिंदू आणि मुस्लिमांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. जिथे हिंदूंमध्ये घटस्फोट आणि विभक्त होण्याचे प्रमाण 1000 पैकी 9.1 आहे. तर मुस्लिमांमध्ये ते 11.7 आहे. तर ख्रिश्चन धर्मात ते 16.6 आणि बौद्ध धर्मात 17.6 आहे.
टीप - वरील माहितीही जनगणनेच्या आधारावर आहे. झी 24 तास या आकडेवारीची पुष्टी करत नाही.