भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले

पाकिस्तान हा दहशतवादाचे केंद्र झाल्याचे बोल भारताने सुनावले.  

Updated: Sep 16, 2020, 08:34 AM IST
भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले   title=

संयुक्त राष्ट्र : पाकिस्तान हा दहशतवादाचे केंद्र झाल्याचे बोल भारताने सुनावले. पाकिस्तानात सांस्कृतिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांवर प्रचंड अत्याचार होत असल्याने पाकिस्तानने मानवाधिकारांवर शहाणपणा शिकवू नये, असे भारताने खडसावले आहे. ४५ व्या मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानला हे सुनावले. 

भारताची प्रतिमा मलीन करणे हे पाकिस्तानसाठी आता सवयीचेच झालेय, अशी टीका भारताने केली. पाकिस्तानातून सातत्याने पाकव्याप्त काश्मिरात इतर नागरिक येऊन राहात असल्याने मूळ काश्मिरींचे अस्तित्वच धोक्यात आल्याचा दावा भारताने केला आहे.

शीख, हिंदू, ख्रिस्ती अल्पसंख्याक समाजाचे पाकिस्तानाच हाल होत आहेत. अल्पसंख्याक मुलींचं, महिलांचे अपहरण होतं, त्यांना पाकिस्तानी मुस्लिम नागरिकांशी जबरदस्ती लग्न करायला लावून त्यांचे धर्म परिवर्तन होत आहे, याकडे भारताने जगाचं लक्ष वेधले.

पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देण्यास व त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत भारताने म्हटले आहे की, हा देश आपल्या सीमेवर 'हिंसाचाराची संस्कृती' बनवित आहे आणि मानवी अल्पसंख्याकांविषयीच्या घृणास्पद नोंदी आणि धार्मिक अल्पसंख्यांकांशी भेदभावपूर्ण वागणूक हे जागतिक समुदायासाठी सतत चिंता करण्याचे कारण आहे.

"दुर्दैवाने, आम्ही पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने भारत विरुद्ध द्वेषयुक्त भाषणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा गैरफायदा घेण्याचा आणखी एक प्रयत्न केल्याचे पाहिले. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाकडून 'शांततेची संस्कृती' ची चर्चा त्यांच्या स्वत: च्या लज्जास्पद नोंदींकडे लक्ष वळविण्याऐवजी काहीच नाही, करत नाही. हिंदू, ख्रिश्चन आणि शीख यासारख्या धार्मिक अल्पसंख्यांकांवर मानवी हक्क आणि त्यांचे उल्लंघन करण्यासाठी वापर करण्यात येत आहे, याकडेही भारताने याकडे लक्ष वेधले.  

धक्कादायक घटना

दरम्यान, पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी आरोपींना अटक झाली. पण या घटनेनंतर पंतप्रधान इम्रान खान सरकावर चौफेर टीका झाली. त्यामुळे इम्रान खान यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोषींना भर चौकात फाशी देणं किंवा रासायनिक पद्धतीने नसबंदीची शिक्षा देण्याचे पर्याय इम्रान सरकारने पुढे ठेवले आहेत.