जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या आकाराच्या उल्कापिंडाची पृथ्वीकडे आगेकूच

अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने एक धक्कादायक बातमी दिली आहे. ही बातमी वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नासाने याला सर्वात धोकादायक सांगितले आहे. 

Updated: Jan 19, 2018, 10:38 AM IST
जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या आकाराच्या उल्कापिंडाची पृथ्वीकडे आगेकूच title=
Image Credit : Image: YouTube/ New Technology

न्यूयॉर्क : अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने एक धक्कादायक बातमी दिली आहे. ही बातमी वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नासाने याला सर्वात धोकादायक सांगितले आहे. 

बुर्ज खलिफापेक्षा मोठा उल्कापिंड पृथ्वीकडे येतोय

2002-AJ129 नावाचा एक अ‍ॅस्ट्रॉयड म्हणजेच उल्कापिंड पृथ्वीकडे अतिशय गतीने येत आहे. या उल्केचा आकार जगातल्या सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा पेक्षाही मोठा आहे. फेब्रुवारीमध्ये हा पृथ्वीचा खूप जवळ असेल, अशी माहिती आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये दुस-या आकाशगंगेतून आलेला एक उल्कापिंड पृथ्वीच्या खूप जवळून गेला होता. आता नवीन धोका पृथ्वीकडे खूप जास्त वेगाने येत आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, साधारण ०.७ मैल मोठा हा उल्कापिंड ४ फेब्रुवारीच्या जवळपास पृथ्वीच्या खूप जवळून जाणार आहे. तशी दिलासादायक बाब म्हणजे हा उल्कापिंडाची पृथ्वीशी टक्कर होणार नाहीये. पण नासानुसार, हा उल्कापिंड खूप मोठा आहे. सध्या हा उल्कापिंड ६७ हजार मैल प्रति तासाच्या म्हणजेच साधारण १,०७,८२६ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पुढे सरकत आहे. 

४ मिलियन किमीच्या अंतरावरून पुढे जाणार

हा उल्कापिंड पृथ्वीच्या २६,१५,१२८ मैल दुरून पुढे जाणार आहे. अंतराळाच्या बाबतीत हे अंतर जास्त मानलं जात नाही. त्यामुळे नासा याला मोठा धोका मानत आहे. याचं कारण हे की, पृथ्वीकडे जर कोणतं प्लॅनेटरी ऑब्जेक्ट आहे तर तो आहे चंद्र. आणि हा चंद्र पृथ्वीचा सॅटेलाईट आहे. तो पृथ्वीच्या २,२८,८५५ मैल दूर आहे. त्यानुसार उल्कापिंड पृथ्वीच्या खूप जवळून जाणार आहे. 

हायपरसॉनिक विमानापेक्षा १५ पटीने जास्त स्पीड

हा उल्कापिंडाची स्पीड खूप जास्त आहे. मनुष्याला सर्वात वेगवान प्रवास करवणारं यान नॉर्न अमेरिकन हायपरसॉनिक एक्स-१५ एअरक्राप्ट मानलं जातं. या यानाने ४,५२० मैल(७,३०० किमी प्रति तास) पर्यंत स्पीड अचिव्ह केली होती. पण या उल्कापिंडाची स्पीड त्यापेक्षा १५ पटीने जास्त आहे. 

पृथ्वीशी टक्कर झाल्यास काय होणार?

2002-AJ129 या उल्कापिंडाला खूप धोकादायक मानलं जात आहे. कारण हा खूप मोठा आहे. जर याची पृथ्वीशी टक्कर झाली तर मोठं नुकसान होऊ शकतं. एखाद्या न्यूक्लिअर हल्ल्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. आजूबाजूला कित्येक किमीचा परिसर जळून राख होईल. अनेक वर्ष याचा प्रभाव जगाला बघायला मिळेल. असे झाल्यास जगात थंडी वाढेल आणि तापमान ८ डिग्रीपर्यंत खाली येईल.