New Planet: पृथ्वी सोडून मानव येथे राहू शकतात; NASA ने शोधलेल्या नव्या ग्रहावर पाण्याची सोय?

 हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे(Earth Like Planet Discovered). या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. 

Updated: Jan 11, 2023, 08:24 PM IST
New Planet: पृथ्वी सोडून मानव येथे राहू शकतात;  NASA ने शोधलेल्या नव्या ग्रहावर पाण्याची सोय?  title=

NASA Found New Planet:  लवकरच नविन ग्रहावर दुसऱ्या जगाची निर्मीती होऊ शकते.  NASA च्या TESS मिशनने एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे. हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे(Earth Like Planet Discovered). या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या ग्रहावर पाणी असल्यास मानवाला राहण्यासाठी हा ग्रह उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्षे दूर आहे. TOI 700 e असे या ग्रहाचे नाव आहे(NASA Found New Planet).  

नासाने शोधलेला हा नविन ग्रह पृथ्वीपासून  सुमारे 100 प्रकाशवर्षे दूर असून  हा लहान ग्रह ताऱ्याभोवती फिरत आहे. हा ग्रह जवळपास पृथ्वीच्या आकाराचा आहे. याचा आकार पृथ्वीच्या 95 टक्के इतका आहे. म्हणजेच हा ग्रह पृथ्वीपेक्षा फक्त 5 टक्के लहान आहे. एम बटू तारा TOI 700 भोवती फिरणारा शोधलेला हा चौथा ग्रह आहे. हे सर्व ग्रह NASA च्या Transiting Exoplanet Survey Satellite अर्थात TESS मिशनने शोधले आहेत.

यापूर्वी 2020 मध्ये NASA ने एक ग्रह शोधला होता. या ग्रहाचे नाव TOI 700 d असे होते. त्याचा आकारही पृथ्वीसारखाच आहे.  या ग्रहांवर पाणी असेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. येथे पाणी असल्यास ऑक्सीजन असण्याचीही शक्यता आहे यामुळे हा ग्रह मानवाला राहण्यासाठी योग्य ठरू शकतो असा संशोधकांचा अंदाज आहे. मंगळवारी अमेरिकेतील सिएटल येथे अमेरिकन अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या 241 व्या बैठकीत हा चौथा ग्रह सापडल्याची घोषणा करण्यात आली.

या ग्रहावर सूर्याची परिक्रमा 10 दिवसांत पूर्ण होते

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने शोधलेल्या सात ग्रहांसह TRAPPIST-1 प्रणालीप्रमाणे. TOI 700 च्या सर्वात जवळचा ग्रह TOI 700 b आहे. हा ग्रह पृथ्वीच्या आकाराच्या 90 टक्के आहे. पृथ्वीला सूर्या भोवती परिक्रमा करण्यास एक दिवस लागतो. मात्र, हा ग्रह दहा एक फेरी पूर्ण करतो. त्यानंतर TOI 700 C हा ग्रह पृथ्वीपेक्षा 2.5 पट मोठा आहे. हा ग्रह 16 दिवसात परिक्रमा पूर्ण करतो.