मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय लक्षात आहे ना? एकनाथ शिंदे असं म्हणातच म्हाडाचे अधिकारी गडबडले आणि...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सरकारी कामकाजात मराठीसाठी आग्रही भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे लक्षात आणून दिले. 

वनिता कांबळे | Updated: Jan 3, 2025, 04:50 PM IST
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय लक्षात आहे ना? एकनाथ शिंदे असं म्हणातच  म्हाडाचे अधिकारी गडबडले आणि...  title=

Eknath Shinde : मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आलंय. मराठी का येत नाही विचारणा-या तरुणालाच माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सरकारी कामकाजात मराठीसाठी आग्रही भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. गृहनिर्माण विभाग अर्थात म्हाडाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे लक्षात आणून दिले. 

गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांचा मराठीचा आग्रह पहायला मिळाला. बैठकीत प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइड दाखवण्यात आल्या. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मराठीत स्लाइडची विचारणा केली.  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे हे लक्षात आहे ना ? अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी हसत खेळत केली.  त्यानंतर लगेचच मराठी स्लाइड पडद्यावर आली .

नव्या गृहनिर्माण धोरणाचं सविस्तर प्रेझेंटेशन सादर केलं जात आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेतून प्रेझेंटेशन सादर करण्याची मागणी केली. 2007 नंतर गृहनिर्माण धोरण तयारच झालं नव्हत. या धोरणाबाबत तसेच विविध विषयांसदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

काय आहे मुंब्रा येथील वाद?

मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आलंय.. मराठी का येत नाही विचारणा-या तरुणालाच माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाही, असं एका मराठी तरुणानं विचारलंय. आणि त्यावरून वाद निर्माण झाला.. त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.. सदर प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित झालाय..  हिंदी येते तर हिंदीत बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनला जमा केलयं.

राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही

केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या  8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय..  विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय.. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे.. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे...