Beer च्या बाटलीवर देवतांचे फोटो, हिंदु धर्मिंयांमध्ये संताप... उत्पादन मागे घेण्याची मागणी

बिअरच्या बाटलीवर हिंदू देवतांचे फोटो छापल्याने हिंदु धर्मीयांमध्ये संताप, कंपनीचा तीव्र विरोध करत उत्पादन मागे घेण्याची मागणी

Updated: Jan 11, 2023, 08:20 PM IST
Beer च्या बाटलीवर देवतांचे फोटो, हिंदु धर्मिंयांमध्ये संताप... उत्पादन मागे घेण्याची मागणी title=

World News : ब्रिटनमध्ये (Britain) मद्य बनवणाऱ्या एका कंपनीचा (Liquor Manufacturing Company) सध्या जोरदार विरोध केला जात आहे. हिंदु धर्मियांनी (Hindus) या कंपनीचं उत्पादन मागे घेण्याची मागणी केली आहे. या कंपनीने बीअरच्या बाटलीवर हिंदू देवतांचे फोटो लावले आहेत (Photos of Hindu Lords on Beer Bottles). एनसाइट यूके (Insight UK) नावाच्या ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. बिएन मंगर (Bien Mangar) नावाच्या कंपनीने हिंदुंच्या भावना भडकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदु समाजाच्या नागरिकांनी असे फोटो असलेल्या बिअरच्या बाटल्या बाजारातून मागे घेण्याची मागणी केली आहे. याआधी 2021 मध्ये दक्षिण-पश्चिमी फ्रान्समध्ये ग्रेनेड-सूर-गोरोन नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने शिवा बिअर लॉन्च केली होती. याला तीव्र विरोध करण्यात आला. तर त्याआधी 2018 मध्येही बियरच्या बाटलीवर देवी कालीमातेच्या फोटोचा वापर केला होता.

मंडाला बिअरच्या बॉटलवर फोटो
बिएन मंगर नावाची ही कंपनी मंडाला बिअर नावाने याची विक्री करत आहे. या बिअरच्या बाटलीवर हिंदू देवीचा फोटो छापण्यात आला आहे. हा प्रकार हिंद धर्मियांसाठी अपमानजनक आणि असंवेदनशील आहे. याला ब्रिटनमधील हिंदू समाजाने तीव्र विरोध केा आहे. तसंच यासंबंधीतली सर्व उत्पादन मागे घेण्याची मागणी केली आहे. 

इनसाइट यूके काय आहे?
मंडाला बिअरची माहिती इनसाइट यूके नावाच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. इनसाइट यूके ही ब्रिटिश हिंदु आणि भारतीयांच्या मुद्यांवर आवाज उठवणारा एक सोशल प्लॅटफॉर्म आहे. अन्यायाविरोधात लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं काम या ट्विटर हँडलद्वारे केलं जातं.

हे ही वाचा : आयुष्यात मित्र असावेत तर असे! परीक्षेची तयारी सोडून स्विटीच्या उपचारासाठी जमवले 'इतके' लाख रुपये

मंडाला बिअर काय आहे?
मंडाला बिअरची 18 शतकाची परंपरा आहे. त्या काळात भारतात तैनात असलेल्या ब्रिटिश सैनिकांसाठी या बिअरचं उत्पादन करण्यात येत होतं. कठिण परिस्थितीशी सामना करण्यासाठी या बिअरमध्ये अल्कहोलची मात्रा जास्त ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे आताही या बिअरमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.