मुंबई : मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी तिजोरीचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. राजे, महाराज्यांच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या तिजोरी होत्या. यामध्ये हिरे, दागिने, पैसे आणि सोने-चांदीच्या वस्तू ठेवल्या जायच्या. परंतु या तिजोऱ्या साध्या सुध्या नव्हत्या. त्यांना उघडण्यासाठी इतकं डोकं लावावं लागाचं की, बस रे बस... त्यामुळे त्याकाळच्या तिजोरीची चावी जरी तुम्हाला सापडली, तरी ती तिजोरी उघडणं इतकं सोपं नव्हतं. परंतु त्या कशा खोलल्या जायच्या हे जाणून घेणं फारचं मनोरंजक आहे.
सध्या अशाच एका तिजोरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो 1840 सालचा आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, ती तिजोरी कशी उघडली जात आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही 1840 सालची इटालियन तिजोरी पाहू शकता. ही तिजोरी लोखंडाची आहे. परंतु ती इतकी मजबूत आणि गुंतागुंतीचे आहे की, तिला उघडताना तुम्ही देखील कन्फ्यूज व्हाल.
या तिजोरीची रचना अगदी वेगळी आहे. त्याच्या मध्यभागी फुलांची रचना आहे. ते चरण-दर-चरण उघडले पाहिजे. तसेच चाव्यांचा पॅटर्न इतका अवघड आहे की, ही तिजोरी फार कमीच लोकच उघडू शकतात.
This Italian safe from 1840 is beautiful and it unlocks in such an interesting way. pic.twitter.com/QoTDUUsroQ
— Lost in history (@lostinhist0ry) July 21, 2022
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फुलाच्या डिझाईनखाली एका वेगळ्या प्रकारच्या चावीने बटण दावला जातो, ज्यामुळे एक पातळ प्लेट बाजूला होते, जेथे तुम्ही मुख्या चावी लावून तिजोरी खोलू शकता. परंतु तेवढंच नाहीय, त्यासाठी तुम्हाला आणखी दोन चाव्यांचा वापर करावा लागेल.
या चाव्यांचा आकारही खूप वेगळा असून सर्व चाव्या वापरूनच तिजोरी उघडली जाते.
@lostinhist0ry नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत 6 मिलियन व्ह्यूज आले आहेत, म्हणजेच ५९ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.