मुंबई : 'Everything is fair in love and war' हे वाक्य तुम्ही कित्तेकदा तरी ऐकलं असेल. अनेकदा तुम्हाला असं आढळून आलं असेल की, पुरुष त्यांच्या पार्टनर सोबत बऱ्याचदा खोटं बोलतात. त्यामागचा हेतू काहीही असला तरी खोटं मात्र बोललंच जातं. सर्वसाधारणपणे पुरुष आपल्या गर्लफ्रेंड किंवा बायकोला हे कोणत्या बाबतीत खोटं बोलतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मी सिंगल आहे - पुरुषाला कोणती मुलगी किंवा महिला आवडली तर तो पुरुष जरी रिलेशनशिपमध्ये असला तरी तो सिंगल असल्याचं सांगतो. असं खोटं बोलून पुरुषाला त्या मुलीशी किंवा महिलेशी होणारा संवाद सुरु ठेवायचा असतो.
मी तिच्याकडे पाहत नव्हतो - अनेकदा महिला आणि पुरुष दोघे एकत्र सोबत असताना तिसरी मुलगी किंवा महिलेला जर पुरुष पाहत असेल आणि हे त्याच्या पार्टनरला समजल्याचं त्याला वाटलं तर शक्यातो पुरुष खोटं बोलतात. अशा परिस्थितीमधे 'मी त्या महिलेकडे पाहत नव्हतो.' असं बोलण्याकडे पुरुषांचा कल असतो किंवा त्या विषयाला डावलून बोलताना विषयांतर केलं जातं.
मी स्मोक करत नाही किंवा मी सेगरेट सोडली आहे - रिलेशनशिपमध्ये असताना गर्लफ्रेंडची भेट घेण्याआधीच पुरुष स्मोक करुन घेतात. अनेकदा 'मी स्मोक करत नाही' असं बोलून आपल्या क्रशला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतात. जर मुलींना असं जाणवलं की आपला बॉयफ्रेंड स्मोक करुन आला आहे अशावेळी 'मी उभा असताना समोरची व्यक्ती स्मोक करत होती.' असं बोलून विषय संपवतात.
मी तझ्याबद्दलच विचार करत असतो - आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी किंवा आपली निष्ठा दाखवण्यासाठी पुरुष नेहमी 'मी तुझ्याबद्दलच विचार करतो.' असं खोटं बोलतात.
मी तुझ्याविना एक दिवस देखील जगू शकत नाही - तुम्ही चित्रपटांत किंवा मालिकांमध्ये अनेकदा पाहिलं असेल की पुरुषांच्या तोंडून एक वाक्य हे येतचं आणि ते म्हणजे 'मी तुझ्याविना एक दिवस देखील जगू शकत नाही.' असे फिल्मी डायलॉग बोलून पुरुष महिलेला किंवा मुलीला इंप्रेस करणायचा प्रयत्न करतात.
पैशांबद्दल खोटं बोलणे - आपल्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी माझ्याकडे खुप पैसा आहे असं सांगत असतात. लग्न झाल्यानंतर मात्र माझ्याकडे पैसे नाहीयेत असं सांगत पुरुष अनेकदा खोटं बोलतात.
तु पहिली मुलगी आहेस जिच्या मी प्रेमात पडलोय - असं अनेकदा आढळून आलं आहे की पुरुष आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी किंवा तीला इंप्रेस करण्यासाठी 'तु पहिली मुलगी आहेस जिच्या मी प्रेमात पडलोय.' असं बोलतात. आपल्या पार्टनरला अनकंफर्ट वाटू नये म्हणून देखील अनेकदा पुरुष असं खोटं बोलतात.