मुंबई : आपल्यासोबत असे अनेकदा होते, जेव्हा आपण आपल्या शरीराशी संबंधीत काही समस्यांकडे लक्ष देत नाही. परंतु तुम्हाला माहितीय का? असं करणं तुम्हाला कितपत महागात पडू शकतं. असाच प्रकार एका व्यक्तीसोबत घडला. या व्यक्तीने त्याच्या श्वसनाच्या संबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष केलं. परंतु जेव्हा त्याला जास्त त्रास झाला आणि तो डॉक्टरांकडे गेला, तेव्हा त्याला जे कळलं, त्यामुळे नुसतं, त्यालाच नाही तर डॉक्टरांना देखील धक्का बसला.
ही घटना इंग्लंडमधील आहे. एका एका 38 वर्षीय पुरुषाला त्याच्या उजव्या नाकपुडीतून अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक वर्ष त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर या व्यक्तीने डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले.
तो व्यक्ती माऊंट सिनाई नावाच्या क्लिनिकमध्ये गेला, जिथे त्याला असे सत्य कळले की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या व्यक्तीची रिनोस्कोपी करण्यात आली होती.
Rhinoscopy ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या नाकात नळी टाकून तपासणी केली जाते. या ट्यूबमध्ये कॅमेरा बसवला जातो आणि तो नाकांत टाकला जातो. या प्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या असे लक्षात आले की, या व्यक्तीच्या नाकाच्या मागील बाजूस एक दात वाढला होता, जो अगदी हाडासारखा दिसत होता.
डॉक्टरांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये डिसेंबरच्या एका अहवालात लिहिले की, त्या माणसाच्या चेहऱ्यावर कोणतीही जखम नाही. तसेच डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोणतंही मार लागल्याचं चिन्ह दिसत नाही. मग याला काय झालं असावं? याचा विचार केल्यानंतर ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. सागर खन्ना आणि डॉ. मायकेल टर्नर यांनी Rhinoscopy करण्याचं ठरवलं, ज्यामध्ये त्यांना हे सत्य उघड झालं. ज्यामुळे त्यांना धक्का बसला.
या दाताबद्दल माहित झाल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करुन तो दात काढला, ज्यानंतर या व्यक्तीचा श्वसनाचा त्रास कमी झाला. यानंतर तीन महिन्यानंतर या व्यक्तीला पुन्हा एकदा जनरल चेकिंगसाठी बोलवण्यात आलं, तेव्हा सर्व काही नॉर्मल होतं आणि हा व्यक्ती देखील रेग्युलर आयुष्य जगु लागला होता.
असे होण्यामागचे कारण स्पष्ट करत डॉक्टर म्हणाले की, हे जिनिटीक देखील अशू शकतं. तसेच जर तोंडात दाताला वाढायला जागा मिळाली नसेल, तर तो मागच्या बाजूने वाढल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाहीय. बऱ्याचदा काही लोकांसोबत असे घडते की, त्यांचे दुधाचे दात पडण्यापूर्वी दुसरे मुळ दाता येतात, तेव्हा ते दात पुढे मागे असे उगवतात. या व्यक्तीसोबत देखील असाच प्रकार घडला असावा.