अमेरिकन आर्मीत दाखल झाली ही भारतीय अभिनेत्री, जाणून घ्या कसे मिळाले यश

Akila Narayanan Join US Army : भारतीय वंशाची तमिळ चित्रपट अभिनेत्री अकिला नारायणन हिने युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलात दाखल होत नवा इतिहास रचला आहे.  

Updated: Mar 2, 2022, 04:18 PM IST
अमेरिकन आर्मीत दाखल झाली ही भारतीय अभिनेत्री, जाणून घ्या कसे मिळाले यश title=

मुंबई : Akila Narayanan Join US Army : भारतीय वंशाची तमिळ चित्रपट अभिनेत्री अकिला नारायणन हिने युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलात दाखल होत नवा इतिहास रचला आहे. ती वकील म्हणून लष्करात दाखल झाली आहे. अकिलाने गेल्यावर्षी दिग्दर्शक अरुलच्या 'कदमपारी' या हॉरर थ्रिलरमधून पदार्पण केले. मिळालेल्या वृत्तानुसार, अकिला हिने अमेरिकन सैन्यात दाखल होण्यासाठी अनेक महिने अमेरिकन सैन्याचे लढाऊ प्रशिक्षण घेतले आहे. (Akila Narayanan is an Indian actress who joined the US Army. Learn how she got success)

लष्करात वकील म्हणून रुजू  

अमेरिकन सैन्याचे यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, अभिनेत्री आता वकील म्हणून अमेरिकन सैन्यात दाखल झाली आहे. अकिला नारायणन ही अमेरिकन लष्करी कर्मचार्‍यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणार आहे. ती राहत असलेल्या देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात दाखल झाली आहे.

सेवेला मानते आपले कर्तव्य 

अकिला ही अमेरिकन लष्कराची सेवा आपले कर्तव्य मानते. अकिला अमेरिकेत राहते आणि 'नाइटिंगेल स्कूल ऑफ म्युझिक' नावाची ऑनलाइन संगीत शाळा देखील चालवत आहे. तमिळ अभिनेत्री या शाळेत विद्यार्थ्यांना संगीताची कला शिकवते.

लोकांकडून देशभक्तीचे कौतुक  

देशसेवेसाठी अकिला नारायणन सैन्यात दाखल झाली आहे. अनेकांनी अकिला यांच्या देशभक्तीचे कौतुक केले असून कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. अकिला नारायणन व्यतिरिक्त, सुमती नारायणन, नारायणन नरसिंहम, ऐश्वर्या नारायणन, सहगर कुंदावदिवेलू, उमा सहगर, आदित्य सेहगर हे कुटुंबीय आणि अन्य सदस्य स्वत:ला आर्मी फॅमिली म्हणवून घेतात आणि अमेरिकन सैन्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य मानत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x