नवी दिल्ली: गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल यांच्यावर केमिकल हल्ला प्रकरणात अमेरिकेसह जगभरातील अनेक देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तर, संतप्त होऊन रशियाच्या ६० अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका सिएटल येथील रशियाचे आर्थिक दुतावासही बंद करणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या बाजूला पाच युरोपीय देशांनीही रशीयाच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात जर्मनी, पोलंड, फ्रान्स, युक्रेन आणि लॅटविया आदी देशांचा समावेश आहे. युरोपमधील इतर देशांनीही या प्रकरणी कडक कारवाईचे संकेत दिले असून, अशीच कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, दक्षिण इग्लंडमध्ये माजी रशीयन गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल आणि त्यांची मुलगी युलीया यांच्यावर नर्व एजंटकडून झालेल्या हल्ल्यात रशीयाचा हात असल्याच्या मुद्द्यावर युरोपीय युनियनचे नेत्यांचे गेल्याच आठवड्यात एकमत झाले होते. दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी इग्लंड आणि त्यांच्या सहकारी देशांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.