Saif Ali Khan Discharged : बॉलिवूड छोटे नवाब सैफ अली खानला (Saif Ali Khan) 5 दिवसांच्या उपचारानंतर लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 16 जानेवारी 2025 ला राहत्या घरात मध्यरात्री एक चोरटा घुसला होता. या चोरा पकडताना झालेल्या चाकुहल्ला नवाब गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी 6 तासांच ऑपरेशन करुन त्याचा मानेतून चाकूचा एक तुकडा काढला. ऑपरेशननंतर शुद्धी आलेल्या सैफ अली खानने डॉक्टरांना दोन प्रश्न विचारले होते. सैफने डॉक्टरला विचारलं की, तो शूट करू शकेल का? यानंतर त्याने विचारलं की त्याला जिममध्ये जाण्यात काही अडचण आहे का? यावर डॉक्टरांनी सध्या विश्रांतीची गरज असल्याचे सांगितलं होतं. आता सैफ अली खानची प्रकृतीचा अंदाज घेत डॉक्टरांनी त्याला सुट्टी दिली असली तरी काही गोष्टींबद्दल त्याला काळजी घेण्यास सांगितलंय.
नवाब अखेर नवाब आहे...!
हल्ल्या झाल्यानंतर पाच दिवसानंतर आज पहिल्यांदाच सैफ अली खान कॅमेऱ्यासमोर आला. हॉस्पिटलमधून बाहेर येतानाचा त्याचा लूक पांढरा शर्ट, निळी डेनिम आणि काळा चष्मा पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. हॉस्पिटलमध्ये असताना सैफ अली खानवर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आला होत्या. घटनेच्या दिवशी रक्तबंबाळ अवस्थेत जो हॉस्पिटलला पोहोचला त्यानंतर उपचारानंतर त्यांची अवस्था काय झाली असेल अशी चिंता चाहत्यांना पडली होती. सैफ अली खानवर एक नाही तर तब्बल 6 धारदार चाकूचे वार झाले होते. त्यामुळे तो जखमी अवस्थेत पाच दिवसांनंतर कसा दिसणार असा प्रश्न पडला होता. पण सैफ अली खानला पाहून हिरो काय असतो ते खरंच कळतं.
सैफ अली खानला सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला असला तरी त्याच्या जखमा अजून ताज्याच असल्याने डॉक्टरांनी त्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगितलंय. या जखमा भरून निघण्यासाठी त्याला पुढचे काही दिवस लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी सैफ अली खानला एक महिना आराम करायला सांगितलाय. तसंच पुढचे काही दिवस जीममध्ये व्यायाम त्याला करता येणार नाहीय. यासह प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत त्याला चित्रपटांच्या शूटिंगसाठीही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच डॉक्टरांनी सैफला कोणतीही जड वस्तू उचलता येणार नाही, हे सांगितलंय.
दरम्यान सैफ अली खान ज्या घरी हल्ला झाला तिथेच राहिला गेलाय. त्या घरात आता सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. तसंच घराच्या बाहेर जाळी लावली गेली आहे.