घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe

जेवणासोबत आपल्याला वेगेवगेळ्या पद्धतीच्या चटण्या खायला आवडतात. याचसाठी आज आम्ही बेसिक पण अतिशय चवदार अशा लसणाच्या चटणी रेसिपी घेऊन आलो आहोत.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 21, 2025, 06:15 PM IST
घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe  title=
Photo Credit: Freepik

How to make Dry Garlic Chutney: आपल्या जेवणाची चव अजून वाढवण्यासाठी आवर्जून चटणी खाल्ली जाते. ही चटणी भारतीय जेवणाचा एक महत्वाचा भाग आहे. याचे अनके फायदेही आहेत. चटण्यांचे अनेक प्रकारही आहेत. पण नेहमीच नवीन रेसिपी शोधणं शक्य आहे. याच साठी आम्ही आज तुमच्यासाठी एक छान आणि सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही स्वादिष्ट आणि झटपट होणारी लसणाची चटणी बनवू शकता. तुम्ही कोरड्या लसणाची चटणी एकदा बनवून अनेक दिवस वापरू शकता. ही चटणी तुम्ही पराठा, चापती, भात आणि अनेक पदार्थांची चव आणखी वाढवू शकते. चला जाणून घेऊया याची सोपी रेसिपी... 

लागणारे साहित्य 

  • लसूण पाकळ्या - 2 कप (सोललेली)
  • शेंगदाणे - 1/2 कप
  • सुकी लाल मिरची – 4-5 (किंवा चवीनुसार)
  • हिंग - 1/4 टीस्पून
  • मेथी दाणे - 1/2 टीस्पून
  • धणे पावडर - 1 टीस्पून
  • हळदी पावडर - 1/2 टीस्पून
  • मीठ - चवीनुसार
  • तेल - 2-3 चमचे

जाणून घ्या कृती 

  • सगळ्यात आधी एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. पण लसूण जळणार नाही याची काळजी घ्या.
  • आता त्याच कढईत शेंगदाणे, सुकी लाल मिरची, हिंग आणि मेथीदाणे टाकून हलकेसे परतून घ्या. 
  • या मसाल्यातून छान सुगंध यायला लागला की गॅस बंद करा.
  • पुढे भाजलेले लसूण आणि मसाले मिक्सरमध्ये घाला आणि धने पावडर, हळद आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या. लक्षात ठेवा मिश्रण फार बारीक नसावे.
  • अशाप्रकारे तुमची कोरडी लसूण चटणी तयार आहे. 
  • ही चटणी अनेकवेळापर्यंत राहू शकते फक्त यासाठी हवाबंद डब्यात भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.