जेरूसलेम: घोटाळे केवळ भारतातच होतात असे नाही. अद्ययावत तंत्रज्ञान, लष्करी सामर्थ्य आणि लोकशाही म्हणून तितकीच उल्लेखनीय सुसूत्रता असलेल्या ईस्राईललाही घोटाळ्यांची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात ईस्राईलच्या पंतप्रधानांचेच नाव आले असून, पोलिसांनी त्यांची दुसऱ्यांदा कसून चौकशी केली आहे. हा घोटाळा टेलिकॉम कंपन्यांशी संबंधीत आहे. उल्लेखनीय असे की, काही दिवसांपूर्वीच नेत्यानाहू आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाल होती. या भेटतीत त्यांनी उभय देशातील विकासावर चर्चा केली होती.
दरम्यान, नेतन्याहूंचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सहकाऱ्यांना ईस्राईलच्या टेलिकॉम कंपनी बेजाकच्या बाजूने प्रचार आणि प्रसार केल्याबद्धल आणि त्या बदल्यात बेजाकची न्यूजसाईट 'वाला'ला नेत्यनाहू आणि त्यांच्या परिवाराच्या बाजूने वार्तांकन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नेत्यनाहूंची दुसऱ्यांदा चौकशी होत आहे.
गेल्या वर्षांपर्यंत टेलिकॉम विभागाचा कारभार नेत्यनाहू यांच्याकडेच होता. दरम्यान, झालेल्या चौकशीबाबत पोलिसांनी कोणतीही टीप्पणी करायला नकार दिला आहे. मात्र, एका प्रतिक्रीयेत म्हटले आहे की, या प्रकरणात वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चौकशी सुरू आहे. सोमवारी सकाळीच पोलिसांना पंतप्रधानांच्या निवासस्थान असललेल्या ठिकाणी धाडण्यात आले. ईस्रायली चॅनल २ टीव्हीने दिलेल्या एका वृत्तात पंतप्रधानांची पत्नी आणि मुलाचीही वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.