ट्रम्प म्हणतात, उत्तर कोरियाचा किम जोंग 'मॅडमॅन'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नॉर्थ कोरियाशी संबंधित आणखी एक वादग्रस्त विधान केलंय... आणि तेही सोशल मीडियावर

Updated: Sep 23, 2017, 04:23 PM IST
ट्रम्प म्हणतात, उत्तर कोरियाचा किम जोंग 'मॅडमॅन'  title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नॉर्थ कोरियाशी संबंधित आणखी एक वादग्रस्त विधान केलंय... आणि तेही सोशल मीडियावर

आपल्याच लोकांना छळणारा आणि ठार मारणारा नॉर्थ कोरियाचा किम जोंग मॅडमॅन आहे... त्याला याआधी कुणालाशी शिकवला नसेल असा धडा शिकवला जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटलंय. 

 

यापूर्वी किम जोंग उन यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला केला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'निराशे'नं हा विश्वास दिलाय की उत्तर कोरियानं  उचललेलं अणुचाचणीचं पाऊल योग्यच आहे, असं किम जोंगनं म्हटलं होतं. तसंच ट्रम्प मानसिकरित्या आजारी आहेत... उत्तर कोरियाला नष्ट करण्याची धमकी देण्याची ते मोठी किंमत चुकवतील, असं जोंग यांनी म्हटलं होतं. 
 
उल्लेखनीय म्हणजे, जोंग आणि ट्रम्प यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे.