मास्को : भारत आणि रशिया यांच्यात एके २०३ रायफल खरेदीचा करार झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ यांच्या मॉस्को दौर्यादरम्यान हा करार करण्यात आला आहे. एके २०३ रायफल एके ४७ ची प्रगत आवृत्ती आहे. भारतीय सैन्याला ७ लाख ७० हजार एके २०३ रायफलची आवश्यकता आहे. यापैकी १ लाख एके २०३ रायफल रशियामधून आयात केल्या जातील.
कलाश्निकोव्ह ही जगातील सर्वात धोकादायक रायफल आहे. गेल्या ७० वर्षांपासून एके ४७ म्हणजे ऑटोमॅटिक Kalashnikov (कलाश्निकोव्ह) हे जगातील सर्वात वेगवान ओळखले जाणारे शस्त्र आहे. एके मालिकेतील रायफल ऑपरेट करण्यापेक्षा सोपे आहे. फारच कमी वेळात शेकडो मीटर अंतरावर त्याच्या गोळ्या आक्रमण करतात. Kalashnikov रायफलचे लक्ष्य अचूक आहे आणि न थांबवता सतत गोळी चालविण्याची क्षमता आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात एके ४७ रायफल ही भारतीय सुरक्षा दलाची पहिली पसंती आहे. भारतीय लष्कराच्या अँटी टेरर फोर्स नॅशनल रायफल्सच्या ध्वजातही एके ४७ ला स्थान देण्यात आले आहे.
#BreakingNews भारत रशिया दरम्यान एके २०३ रायफलीच्या खरेदीचा करार ।संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को दौऱ्यात करारावर स्वाक्षरी । १ लाख रायफली रशियातून होणार आयातhttps://t.co/Ct4fYeN6GF@ashish_jadhao pic.twitter.com/s1rlPiD4GT
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 4, 2020
भारत-चीनमध्ये सीमावादावरुन तीव्र तणाव निर्माण झाला आहे. सीमेवर चीनकडून सातत्याने हालचाली सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर भारताने रशियाबरोबर एके २०३ रायफलीबाबत करार केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. १ लाख रायफली रशियातून आयात केल्या जाणार आहेत. एके २०३ या अत्याधुनिक असॉल्ट रायफलच्या खरेदीचा आणि भारतात उत्पादनाचा महत्त्वपूर्ण करार भारत आणि रशिया यांच्यात झाल्याने भारतीय संरक्षणदलाची ताकद वाढली आहे. भारतात या रायफलींचे उत्पादन करण्यात येणार आहे. एके ४७ या प्रकारातली आत्तापर्यंतची सर्वाधिक अत्याधुनिक रायफल म्हणजे एके २०३. या रायफली भारतीय लष्करासाठी तयार झाल्यावर सध्या वापरात असलेल्या इन्सास रायफली सेवेतून निवृत्त होतील.
एके २०३ या प्रत्येक रायफलीची किंमत ११०० अमेरिकन डॉलर्स असेल. यात तंत्रज्ञान हस्तांतरण, कारखाना निर्मिती यांचाही अंतर्भाव असेल. भारताला ७ लाख ७० हजार रायफलींची आवश्यकता आहे. त्यापैकी १ लाख रायफली रशियातून तातडीने आयात होतील तर उर्वरीत रायफली भारतात तयार होतील. भारत रशिया जॉईंट व्हेंचरमध्ये ५०.५ टक्के शेअर्स हे भारताच्या वॉर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे असतील. तर कलाशनिकॉव्ह ग्रुपचे ४२ टक्के आणि रोसोबोरॉन एक्सपोर्टचे ७.५ टक्के शेअर्स असतील. उत्तर प्रदेशातल्या कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरीत या रायफलींचे उत्पादन होणार आहे.