मी शेवटचा श्वास घेऊन... ट्रान्सजेंडर फ्लाइट अटेंडंटने भावनिक पोस्ट लिहीत स्वतःला संपवलं!

Kayleigh Scott : युनायटेड एअरलाइन्सची ट्रान्सजेंडर फ्लाइट अटेंडंट केयली स्कॉटने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून जगाचा निरोप घेतला. 25 वर्षीय स्कॉट सोमवारी तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती

Updated: Mar 25, 2023, 11:56 AM IST
मी शेवटचा श्वास घेऊन... ट्रान्सजेंडर फ्लाइट अटेंडंटने भावनिक पोस्ट लिहीत स्वतःला संपवलं! title=
(फोटो सौजन्य - hayitskay97)

Kayleigh Scott : अमेरिकेतील (US) कोलोरॅडो येथे राहणाऱ्या एका ट्रान्सजेंडर फ्लाइट अटेंडंटचा (Transgender Flight Attendemt) मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. केयली स्कॉट (Kayleigh Scott) नावाच्या या ट्रान्सजेंडर फ्लाइट अटेंडंटने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या 25 वर्षाची केयली स्कॉट युनायटेड एअरलाइन्समध्ये  (United Airlines) काम करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी स्कॉटने एक भावनिक फेसबुक पोस्टही लिहीली होती. या घटनेमुळे स्कॉटने एवढ्या टोकाचं पाऊल का उचचलं याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

सोमवारी केयली स्कॉट तिच्या कोलोरॅडो येथील घरात मृतावस्थेत आढळली होती. प्राथमिक तपासानुसार तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 2020 मध्ये ट्रान्स डे ऑफ व्हिजिबिलिटीसाठी बनवलेल्या व्हिडिओमध्येही ती दिसल्यानंतर केयली स्कॉट प्रकाशझोतात आली होती. एलजीबीटीक्यू कम्युनिटीच्या हक्कांसाठी ती नेहमीच पुढाकाराने बोलत असायची. मात्र आता तिच्या अकाली जाण्याने एलजीबीटीक्यू समाजाला मोठा धक्का बसला आहे.

मला माफी मागायची आहे...

स्कॉटने 20 मार्च रोजी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या मैत्रिणी सिंथिया, रेगिन आणि सोफिया यांची माफी मागितली होती. या पोस्टनंतर स्कॉटच्या मृत्यूची बातमी समोर आली. "मी शेवटचा श्वास घेऊन ही पृथ्वी सोडत आहे. मला सर्वांची माफी मागायची आहे. मला माफ करा. मी यापेक्षा चांगली वागू शकली नाही. मी ज्यांच्यावर प्रेम करते त्यांच्यासाठी... मला माफ करा की मी मजबूत होऊ शकले नाही.  मी स्वत:मध्ये सुधारणा करू शकलो नाही, त्यामुळे मला हे कठोर पाऊल उचलावे लागले," असे केयली स्कॉटने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याआधीही स्कॉटने एका पोस्‍टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 2022 हे वर्ष माझ्यासाठी खूप वाईट गेले आहे. या वर्षी मी खूप काही गमावले. माधी कंपनी कर्मचारी म्हणून माझा आदर करत नाही म्हणून नोकरी करून काही फायदा नाही. 2023 तरी चांगलं जावो अशी शुभेच्छा, असे स्कॉटने म्हटले आहे.

तुझ्यासारखी मुलगी असल्याचा अभिमान

केयली स्कॉटच्या मृत्यूनंतर तिची आई आंद्रिया साल्वेस्ट्रो यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "केयली स्कॉट... तुझ्यासारखी मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. तू तुझ्या आयुष्यात जे काही केलेस त्याचा मला अभिमान वाटतो. तुझे हसणे खूप सुंदर होते. तुझे मन खूप शुद्ध होते," असे आंद्रिया साल्वेस्ट्रो यांनी म्हटले आहे.