जगावर पुन्हा युद्धाचे ढग; आता सिरियावर अमेरिकेचा हवाई हल्ला, 11 जण ठार

US Airstrikes on Syria : सिरियावर अमेरिकेने हवाई हल्ला केला. इराण समर्थक गटाच्या तळावर हा हवाई हल्ला करण्यात आला असं सांगण्यात येत आहे. जगात रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध वर्ष झाले तरी थांबलेले नाही. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर युद्धाची चर्चा सुरु झालेय.

Updated: Mar 25, 2023, 09:58 AM IST
जगावर पुन्हा युद्धाचे ढग; आता सिरियावर अमेरिकेचा हवाई हल्ला, 11 जण ठार  title=

US Airstrikes on Syria : पश्चिम आशियातल्या सिरियावर अमेरिकेने मध्यरात्री हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 11 जण ठार झाल्याचे सांगितलं जात आहे. इराण समर्थक गटाच्या तळावर हा हवाई हल्ला करण्यात आला असं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा युद्धाचे ढग निर्माण होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. जगात रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध वर्ष झाले तरी थांबलेले नाही. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर युद्धाची चर्चा सुरु झालेय.

अमेरिकेच्या तळावर ड्रोन हल्ला केला आणि...

इराण समर्थक गटाने अमेरिकेच्या तळावर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात एक कंत्राटदार ठार तर 5 अमेरिकन सैनिक जखमी झाले होते. गुरुवारी आणि शुक्रवारी अमेरिकेच्या तळावर हल्ले झाले होते. त्यानंतर अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्या ड्रोनद्वारे अमेरिकन तळावर हल्ले झाले ते ड्रोन इराणी बनावटीचं असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिली आहे. 

इराण समर्थक गटाच्या तळावर हा हल्ला 

सीरियाने लगेच प्रत्युत्तर दिलेले नाही, परंतु सरकारी टीव्हीने सांगितले की, सीरिया-इराक सीमेजवळील अनेक ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पहाटेच्यावेळी हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात एक सैनिक ठार झाला आणि चार जण जखमी झाले आहेत.

मात्र, स्थानिक लोकांच्या माहितीचा हवाल्याने रॉयटर्सने म्हटले आहे की, 17 लोक ठार झाले आहेत. मात्र, त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. इराकमध्ये नाही तर फक्त सीरियामध्ये हल्ला करण्याचा अमेरिकेचा निर्णय होता, असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निर्देशानुसार, अमेरिकेच्या लष्करी दलांनी आज संध्याकाळी पूर्व सीरियामध्ये इराण समर्थक दहशतवादी गटांनी वापरलेल्या पायाभूत सुविधांवर हवाई हल्ले केलेत.