अरेच्चा ! जन्मताच ही मुलगी आपल्या आईच्या मिठीतच शिरली

  एक मुलगा जन्मल्यावर काही सेकंदातच चालायला लागला होता हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वायरल झाला होता. काही खुप लोकांनी तो लाईक, शेअर केला गेला.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 6, 2017, 02:40 PM IST
अरेच्चा ! जन्मताच ही मुलगी आपल्या आईच्या मिठीतच शिरली title=

नवी दिल्ली :  एक मुलगा जन्मल्यावर काही सेकंदातच चालायला लागला होता हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वायरल झाला होता. काही खुप लोकांनी तो लाईक, शेअर केला गेला.

त्यानंतर खुप लोकांनी याला एक चमत्कार तर काहींनी हे फेक असल्याचे सांगितले. यावेळेसही असच काहीस झाल आहे. यावेळेस एक नवजात मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिने जन्म झाल्यावर काही सेकंदातच आपल्या मम्मीला मिठी मारली आणि किस केले.

मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडिओ ब्राझीलचा असल्याचे सांगितले जात आहे. या जन्मास आलेल्या मुलीचे नाव अगाता आहे. जिने जन्मताच सर्वांना अचंबित करुन टाकले आहे. या सर्वात सुंदर क्षणांना व्हिडिओत कैद करण्यात आले आहे. ५ एप्रिलला ब्राझीलच्या सांता मोनिका हॉस्पीटलमध्ये हिचा जन्म झाल्याचे सांगितले जात आहे.

२४ वर्षाच्या ब्रेंडाने अगाताला जन्म दिला. जन्म झाल्यावर अगाताला जेव्हा तिच्या आईकडे म्हणजेच ब्रेंडकडे नेण्यात आले तेव्हा आजुबाजुच्यांना चमत्कारच पाहायला मिळाला. ही चिमुरडी चक्क आपल्या आईच्या मिठीतच शिरली.

आपल्या मुलीच्या पहिल्या स्पर्शाला मी कधीच विसरु शकणार नाही आणि हे शब्दात वर्णन करता येणार नाही असे ब्रेंडा हिने सांगितले.

अगाता आता तीन महिन्याची झाली आहे. पण या प्रेमळ स्पर्शाचा व्हिडिओ आता बाहेर आला आहे.

( देशविदेशात व्हायरल होणाऱ्या घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा या बातमीतून प्रयत्न आहे. या वृत्ताच्या सत्त्यतेला ‘ZEE २४ तास’ दुजोरा देईलच असे नाही)