उ. कोरियावर संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध आणखी कडक

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध अधिक कडक केलेत. वारंवार इशारा देऊनही आपल्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला ब्रेक न लावणारे उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांना अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला हा पहिला मोठा आर्थिक दणका आहे. 

Updated: Aug 6, 2017, 10:05 AM IST
उ. कोरियावर संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध आणखी कडक title=

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध अधिक कडक केलेत. वारंवार इशारा देऊनही आपल्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला ब्रेक न लावणारे उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांना अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला हा पहिला मोठा आर्थिक दणका आहे. 

या निर्बंधांनुसार उत्तर कोरियातून कोळसा, लोह, शिसे, मासे आदीच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे या देशाला 1 अब्ज अमेरिक डॉलर्सचा दणका बसेल, असं मानलं जातंय. विशेष म्हणजे अमेरिकेनं प्रस्तावित केलेल्या या निर्बंधांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं एकमुखी मान्यता दिलीये.

उत्तर कोरियाचं मित्रराष्ट्र असलेल्या चीननं देखील या निर्बंधांना पाठिंबा दिलाय. चीननं आपण वारंवार सांगूनही ऐकत नसल्याची शिक्षाच एका अर्थी उत्तर कोरियाला दिलीये.