या देशात मास्क न वापरणाऱ्यांना ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा

 मास्क न घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय

Updated: Jul 23, 2020, 03:30 PM IST
या देशात मास्क न वापरणाऱ्यांना ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा  title=

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील मास्कमध्ये दिसू लागलेयत. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जॉंगनी देखील याचा धसका घेतलाय. त्यामुळे आता मास्क न घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय कोरियात घेण्यात आलायं. 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरिया सरकार कठोर पाऊल उचलताना दिसतंय. मास्त ने वापरणाऱ्यांना ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येणार आहे. सरकारच्या या आदेशानंतर लोकांमध्ये खळबळ माजलीय. कारण किम जॉंग उनच्या निर्णयाविरोधात जाण्याची हिम्मत कोणी करणार नाही. 

उत्तर कोरिया प्रशासनाने दिलेला निर्णय लागू करण्यासाठी पोलीसांसोबत कॉलेज आणि हायस्कूलमध्ये टीम बनवण्यात आल्या आहेत. या टीम सगळीकडे फिरुन लोकांवर लक्ष ठेवतील. अमेरिकेची वेबसाईट रेडीओ फ्री एशियामध्ये यासंदर्भातील वृत्त देण्यात आलंय. 

कोरोनाचे संकट पाहता या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला ३ महिने सक्त मजुरी करावी लागेल. मग तो कोणीही असो असे उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

तसं पाहता उत्तर कोरियामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात कोणते गंभीर वृत्त समोर आले नाही. पण गेल्या महिन्यात उत्तर कोरियाजवळ असलेल्या चीनी प्रांतातून प्रादुर्भावाच्या बातमीने सरकार अस्वस्थ झालं होतं. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून शाळेच्या मुलांना १ जुलैपासून सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं.