पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल

Google Search 2023 : 2023 हे वर्षं संपत आलंय आणि या वर्षात इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च गेलं यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यात भारतातले काही चेहरे असे आहेत ज्यांना भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानातही जास्त सर्च केलं गेलंय.

राजीव कासले | Updated: Dec 18, 2023, 06:45 AM IST
पाकिस्तानी नागरिक या चार भारतीयांना जास्त सर्च करतात, चौथं नाव वाचून आश्चर्य वाटेल title=

Google Search 2023 : 2023 वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे आणि नविन म्हणजे 2024 वर्षाची (New Year) सर्वांना उत्सुकता लागलीय. पण जूनं वर्ष संपताना या वर्षात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. यापैकीच एक म्हणजु गुगलने एक यादी जाहीर केली आहे. कोणत्या देशातल्या लोकांनी कोणती गोष्ट इंटरनेटवर जास्त सर्च केली. आपल्या शेजारचा देश म्हणजे पाकिस्तानतल्या (Pakistan) नागरिकांनी इंटरनेटवर सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची माहिती मिळवली हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पाकिस्तानात 2023 मध्ये भारतातल्या चार लोकांबद्दल सर्वात जास्त माहित मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या चारही व्यक्ती भारतात लोकप्रिय आहेत. 

पहिल्या क्रमांकावर अक्षय कुमार
किंग खान अर्थात शाहरुख खान आणि भाईजान अर्थात सलमान खान जगभरात प्रसिद्ध आहेत. पण बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) पाकिस्तानात सर्वाधिक लोकप्रिय आहे. अक्षय कुमार हा भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अक्षय कुमारचे चित्रपट भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात पाहिले जातात. पाकिस्तानात अक्षय कुमारला सर्वाधिक सर्च करण्याचं कारण म्हणजे तो विनोदी आणि देशभक्तीवर आधारीत चित्रपटात काम करतो. 

दुसऱ्या क्रमांकावर टाइगर श्रॉफ
पाकिस्तानात 2023 मध्ये सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shrauf) दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिरोपंती या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या टायगर श्रॉफने अनेक हिंदी अॅक्शनपट चित्रपटात काम केलं आहे. पाकिस्तानातल्या युावा वर्गात टायगर श्रॉफची मोठी क्रेझ आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टायगर श्रॉफची पिळदार शरीरय्ष्टी आणि त्याची अॅक्शन. यामुळेच पाकिस्तानातही त्याचा फॅन फॉलोईंग आहे. 

तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल
भारताचा युवा क्रिकेट स्टार शुभमन गिल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2023 हे वर्ष शुभमन गिलसाठी (Shubman Gill) चांगलंच लाभदायी ठरलं. या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुभमन गिल हा अव्वल स्थानावर आहे. या वर्षात शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 1230 धावा केल्या आहेत. यात पाच शतकांचा तर पाच अर्धशतकांचा समावेश आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बादशाहत मोडत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून शुभमन गिलकडे पाहिलं जातं. त्यामुळे पाकिस्तानातच नाही तर भारतातही त्याचे अनेक चाहते आहेत. 

चौथ्या क्रमांकावर काजोल
या यादीतलं चौथं नाव वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण यादीत चौथ्या क्रमांकावर आहे बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol). खरं तर काजोल हिंदी चित्रपटसृष्टीपासून बराच काळ बाहेर आहे. पण या ना त्या कारणाने ती नेहमीच चर्चेत असले. नुकतंच काजोलने मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्यामुळे तिच्याबद्दल पाकिस्तान नागरिकांना तिच्याबद्दल जाणून घेण्यात स्वारस्य आहे.