मुलाखतीसाठी कॅमेरा होता सुरू याकडे तिचं लक्षच नव्हत अन् नको ते करून बसली

VIRAL NEWS : बऱ्याचदा आपण तंत्रज्ञानच्या चुकीच्या वापरामुळे अडचणीत येतो. नोकरीसाठी ऑनलाइन मुलाखत देणाऱ्या एका तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. स्कायवेस्ट एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट या पदासाठी ही तरुणी मुलाखत देत होती.

Updated: Feb 11, 2022, 03:44 PM IST
मुलाखतीसाठी कॅमेरा होता सुरू याकडे तिचं लक्षच नव्हत अन् नको ते करून बसली title=

नवी दिल्ली :  कोरोना संसर्गामुळे लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा अधिक वापर करायला लागलो आहोत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत तंत्रज्ञानाची नवीन पद्धत सर्वांनीच आत्मसात केली आहे. मुले ऑनलाइन वर्गात सहभागी होत असताना, तरुण घरून काम करत आहेत. वृद्ध देखील ऑनलाइन मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहेत. बऱ्याचदा आपण तंत्रज्ञानच्या चुकीच्या वापरामुळे अडचणीत येतो. नोकरीसाठी ऑनलाइन मुलाखत देणाऱ्या एका तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. स्कायवेस्ट एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट या पदासाठी ही तरुणी मुलाखत देत होती.

ऑनलाईन मुलाखती दरम्यान मोठी चूक

शैलीन मार्टिनेझ नावाची तरुणीची नोकरीसाठी लॅपटॉपवर ऑनलाइन मुलाखत होती. लॅपटॉवर सुरू असलेली रेकॉर्डिग या तरुणीच्या लक्षात आली नाही. बोलताना तीने कंपनीच्या एका प्रश्नाची खिल्ली उडवली. परंतू त्यामुळे आता तिची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑनलाइन मुलाखतीमध्ये अशा चुका करू नये हे या व्हायरल व्हिडिओमुळे स्पष्ट होत आहे.

शैलेनला विचारण्यात आले, 'स्कायवेस्ट कंपनीच्या संस्कृतीबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे आणि तुम्ही कंपनीशी कसे जुळवून घ्याल? या व्हिडीओमध्ये ती या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे आणि फोनवर कोणाशी तरी बोलत असताना तिने सांगितले की, हा माझ्या आयुष्यातला सर्वात मूर्ख प्रश्न आहे. दुर्दैवाने, तिला कल्पना नव्हती की रेकॉंर्डिंग सुरू आहे.

अचानक, तिच्या लक्षात आले की तिची प्रतिक्रिया रेकॉर्ड होत आहे. हे पाहिल्यानंतर ती घाबरली, तिची चूक तिच्या लक्षात आली. मार्टिनेझ कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर म्हणाली की, 'मला माफ करा, मला माहित नव्हते की हे रेकॉर्ड केले जात आहे, मी सराव करत होते,' त्यानंतर मुलाखतकाराने अचानक व्हिडिओ बंद केला.