फेकून दिलेल्या नारळाच्या करवंट्यांना मोठी मागणी, काय आहे या मागील कारण? जाणून घ्या

ऑनलाइन साइट्सवर नारळाच्या करवंट्या विकायला आल्या आहेत, ज्या तुम्हाला 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Updated: Feb 11, 2022, 01:40 PM IST
फेकून दिलेल्या नारळाच्या करवंट्यांना मोठी मागणी, काय आहे या मागील कारण? जाणून घ्या  title=

मुंबई : आपण बऱ्याचदा बाजारातून नारळ खरेदी करतो आणि त्याचे पाणी पिऊन त्याच्या वरचं कवच फेकून देतो. तसेच आपण घरी देखील जेवणात घालण्यासाठी किंवा पदार्थ बनवण्यासाठी नारळ घेऊन येतो. परंतु तुम्हाला हे माहितच आहे की, नारळाचं कवच कडक असल्यामुळे त्याला आपण फेकून देतो किंवा लहान बाळांसाठी ठेवतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही फेकून देत असलेले नारचं कवच किंवा करवंट्या यांची मागणी वाढली आहे. आता ते महागड्या किमतीत विकले जात आहे आणि अनेक परदेशी साइट्सवरही त्याची विक्री देखील होत आहे.

किती रुपयांना विकली जातात?

ऑनलाइन साइट्सवर नारळाच्या करवंट्या विकायला आल्या आहेत, ज्या तुम्हाला 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर तुम्हाला किलोच्या आधारावर देखील नारळाच्या करवंट्या विकल्या जात आहेत.

तर तुम्हाला परदेशी साइटवर 21 डॉलर पर्यंत उपलब्ध आहे आणि यासाठी 10  डॉलर पर्यंतची शिपिंग चार्जेस देखील घेतले जात आहे. अशा परिस्थितीत ते तुम्हाला 31 डॉलरपर्यंत उपलब्ध होईल, म्हणजे एका नारळाच्या करवंटीसाठी, तुम्हाला 2 हजार रुपये खर्च करावे लागतील.

लोक का खरेदी करत आहेत?

आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की, आपण ज्या करवंट्या कचऱ्याच फेकून देतो, त्याचं नक्की असं काय महत्व असेल, ज्यामुळे लोकं त्याला इतके पैसे देऊन विकत घेत आहेत? तर या नारळांच्या वाट्या किंवा करवंट्या वाटी म्हणून वापरल्या जातात. बरेच लोक त्याचा ट्रे म्हणून वापर करत आहेत. तसेच त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात.

तसेच कवचावर अनेकांची रचना केली जाते आणि ती सजावट म्हणून वापरली जाते. तसेच हल्ली लोक होम प्लान्ट लावण्यासाठी देखील त्याचा वापर करतात. त्यांचा कल वाढल्याने मागणी वाढत असून महागड्या दराने या करवंट्या विकल्या जात आहेत.