याला म्हणतात नशीब! मुलीचा जीव वाचवण्यासाठी सर्व काही गमावलं पण एका क्षणात परत मिळालं

Lottery :  जे नशिबात असं ते परत मिळतचं. मुलीला वाचवण्यासाठी सर्व गमावलं पण ते सर्व व्याजासहित परत मिळाले आहे. 

Updated: Apr 13, 2023, 10:54 PM IST
याला म्हणतात नशीब! मुलीचा जीव वाचवण्यासाठी सर्व काही गमावलं पण एका क्षणात परत मिळालं title=

Lottery : जीवा पुढे पैशाला किंमत नसते. कॅन्सरमुळे मृत्यूच्या दारात पोहचलेल्या मुलीला वाचवण्यासाठी आईने आपली सर्व संपत्ती पणाला लावली. या माऊलीने सर्व काही गमवाले. पण, नशिबाने तिला असा सुखद धक्का दिला की. मुलीच्या उपचारासाठी खर्च केलेला सर्व पैसा या माऊलीला परत मिळाला आहे. फ्लोरीडामध्ये घडलेली ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. कुणाचं नशीब कधी उघडेल हे काही सांगू शकत नाही. 

लेकलँड गिम्बलेट असे या नशिबवान महिलेचे नाव आहे. गिम्बलेट यांच्या मुलीला कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला होता. मुलीला कॅन्सर झाल्याची बातमी कळताच त्यांना धक्का बसला. मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. सर्वात एक्सपर्ट डॉक्टरकडे त्यांनी मुलीचे उपचार केले. डॉक्टरांनी मुलीवर शस्त्रक्रिय करण्याचा सल्ला दिला.

सर्व संपत्ती पणाला लावली

गिम्बलेट यांनी मुलीचा जीव वाचवण्यासाठा आपली सर्व संपत्ती पणाला लावली. आयुष्यभराची सर्व कमाई त्यांनी मुलीच्या उपचारावर खर्च केली. एकही पैसा त्यांच्या हातात शिल्लक उरला नाही. फक्त मुलगी वाचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते.

अचानक नशिब पालटले

गिम्बलेट यांच्या मुलीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यानंतर ज्या दिवशी त्यांच्या मुलील हॉस्पीटमधून डिस्चार्ज देण्यात आला त्यांच दिवशी त्यांनी एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले. येथेच त्यांच्या आयुष्यात त्यांना दुसरा सुखद धक्का मिळला. 

16 कोटींची लॉटरी जिंकली

मुलीच्या उपचारासाठी गिम्बलेट आयुष्यभर मोठ्या मेहनतीने कमावलेली  पै ना पै खर्च केली. मात्र, त्यांच्या नशिबात जे होते त्यांना ते परत मिळालचं. कारण गिम्बलेट यांनी 2 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 16 कोटींची लॉटरी जिंकली. या पैशातील 2,000 पौंड म्हणजेच सुमारे 1 लाख रुपये कमिशन सोडून उर्वरीत सर्व रक्कम गिम्बलेट  यांना मिळाली आहे. 

जे नशिबात असं ते परत मिळतचं

लॉटरी जिंकल्यानंतर गिम्बलेट यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुलीला वाचवण्यासाठी गिम्बलेट यांनी मागचा पुढचा विचार न करता सर्व पैसा खर्च केला. त्या एका क्षणात कंगाल झाल्या होत्या. तसच ही लॉटरी जिंकल्यानंतर त्या एका क्षणात करोडपती देखील झाल्या. त्यांचे हे गुडकल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.