Moon Soil to Build Lunar Bases : कवींच्या कल्पना विश्वास आणि मुलांच्या परीकथांमध्ये चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्रावर राहण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच पूर्ण आहे. कारण येत्या पाच वर्षात चीन चंद्रावर घर बांधणार आहे. विशेष म्हणजे यासाठी चंद्रावरची माती वापरुन विटा बनवल्या जाणार आहेत. चंद्रावर लूनर बेस (Lunar base)बनवण्याची चीनची योजना आहे.
चंद्रावर नावी वस्ती निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. अनेक देश वेगवेगळ्या मोहिमा आखत आहेत. चंद्रावर संशोधनासाठी देशांच्या जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. चीन आपल्या जागेत लूनर बेस (Lunar base) उभारणार आहे.
चंद्राच्या तळाजवळ चीन एक कॅम्प उभारणार आहे. येथे शास्त्रज्ञांना राहता येईल अशा प्रकारचा लूनर बेस विकसीत करण्याची चीनची योजना आहे. 100 हून अधिक चिनी शास्त्रज्ञ, संशोधक आणि स्पेस संस्थांनी नुकतीच चीनमधील वुहान येथे एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये चीनच्या आगामी मोहिमांबाबत चर्चा करण्यासाठी तसेच चंद्रावर पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या योजनांवर चर्चा करण्यात आली. यातच लूनर बेस उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
चंद्राच्या मातीपासून विटा बनवण्यासाठी एक टीम 'चायनीज सुपर मेसन्स' नावाचा रोबोट तयार करत आहे. यनीज अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे तज्ज्ञ डिंग लीयुन यांनी याबाबतची माहिती दिली. चंद्रावर पाणी नाही. तसेत येथे गुरुत्वाकर्षण देखील काम करत नाही. चंद्रावर वारंवार भूकंप आणि भयंकर वैश्विक किरणोत्सर्ग होत असतात. अशा परिस्थितीत चंद्रावर लूनर बेस विकसीत करताना संशोधकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रत्यक्षात लूनर बेस उभारताना कोणत्या अडचणी येवू शकतात याबाबत वुहान येथील परिषदेत चर्चा करण्यात आली.
चंद्रावर सातत्याने संशोधन सुरु आहे. यामुळे दीर्घकालीन चंद्र संशोधनासाठी येथे लूनर बेस उभारणे गरजेचे आहे. चीनच्या या विशेष मोहिमेचे नाव चेंज-8 असे आहे. या मोहिमेअंतर्गत 2028 च्या आसपास चंद्राच्या मातीपासून विटा बनवणारा रोबोट येथे लाँच केला जाणार आहे. हा रोबोच चंद्रावरची माती वापरुन येथेच वीटा तयार करुन लूनर बेस उभारणार आहे. या मोहिमे अंतर्गत 2025 पर्यंत चंद्राच्या सर्वात दुर्गम भागातून मातीचा पहिला नमुना आणण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी चीनने 2020 मध्ये चेंज-5 मोहिमेदरम्यान चंद्राच्या जवळून मातीचे नमुने आणले आहेत. पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये, चेंज-7 मिशन लाँच केले जाणार आहे.
या अंतर्गत दक्षिण ध्रुवाच्या एटकेन बेसिनजवळ विवरांच्या तळाशी पाण्याचा बर्फा शोध घेतला जाणार आहे.