भारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत!

 पाकिस्तानात सध्या पूर आला आहे. 

ANI | Updated: Aug 20, 2019, 07:20 PM IST
भारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत! title=
Pic Courtesy : Reuters

इस्लामाबाद : सर्जिकल स्ट्राईक आणि नंतर बालाकोट हवाई हल्ले यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानला आता जळी, स्थळी, काष्ठी, पाषणी भारतच दिसायला लागला आहे. पाकिस्तानात सध्या पूर आला आहे. त्यातही भारताचाच हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. 

भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांमध्ये भारताने कोणतीही पूर्वसूचना न देतात करोडो लीटर पाणी सोडून दिले. त्यामुळे पाकिस्तानात नदी काठच्या गावांमध्ये महापूर आल्याचा दावा तिथल्या प्रसारमाध्यमांनी केला आहे. भारताने मोठ्या प्रमाणावर पाणी सतलज नदीत सोडल्याचा दावा केला जात आहे. यामुळे सतलज नदी लगतच्या अनेक जिल्ह्यातली शेती पाण्याखाली आली. 

हजारो लोकांचे सुरक्षित जागी स्थलांतर करावे लागले. पुढील २४ तासांत पुन्हा भारतीय हद्दीतून पाकिस्तानच्या हद्दीत पाणी सोडलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लडाख धरणातले पाच पैकी तीन कालवेही भारताने अचानक उघडलेत. त्यामुळे परिसरात पूर आला आहे. भारताने सिंधू पाणीवाटप कराराला केराची टोपली दाखवल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. भारताकडून विसर्गाबाबत कोणतीही आकडेवारी दिली जात नाही, असा पाकिस्तानचा आरोप आहे.