Trending : मासा आणि मगरीचं घनघोर युद्ध... पण निकाल लागला अनपेक्षित.. पाहा व्हिडीओ

मगर शिकार करायला आली मात्र स्वत: जीव गमावून बसली, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ

Updated: Sep 28, 2022, 10:36 PM IST
Trending : मासा आणि मगरीचं घनघोर युद्ध... पण निकाल लागला अनपेक्षित.. पाहा व्हिडीओ title=

Fish and crocodile fight : जशी आपल्या मनात वाघ, सिंह या प्राण्यांबाबत भीती आहे. तशी भीती आपल्या मनात मगरींबाबत देखील आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीत अनेक मगरी आहेत आपल्याला माहित आहे. अनेकदा या मगरी किनाऱ्यावर देखील येतात. या मगरीचे व्हिडीओ पाहूनच आपल्या काळजाचा थरकाप होतो. मात्र एका लहानशा माशाने या मगरीला चारी मुंड्या चीत केलं असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही.  हे असं खरंच झालंय. महत्त्वाचं हणजे याचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. कारण या माशाचा एक झटका या मगरीला पडलाय जीवघेणा.  

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. आपल्यासारख्याना हे व्हिडीओ पाहायला आवडतात म्हणून हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होता. लहान मुलांचे क्युट व्हिडीओ किंवा प्राण्यांच्या फाईटचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असाच काहीसा हा व्हिडीओ आहे. 

या व्हिडिओमध्ये एक मगर पाहायला मिळतेय. या मगरीसमोर एक मासा आहे. हा एक ईल जातीचा मासा आहे असं समजतंय. काही क्षणात ही मगर या माशावर हल्ला चढवते. मगर माशाला आपल्या जबड्यात पकडते. हा मासा काही क्षण तडफडताना पाहायला मिळतो. पण सोबत मगर देखील तडफडताना पाहायला मिळते. मगरीचे हालचाल पाहायला मिळते म्हणून नक्की काय झालं हे समजत नाही. मात्र काही क्षणात मगरीची हालचाल थंडावते. या व्हिडिओत ही मगर निपचित झालेली पाहायला मिळते आणि मासाही मेलेला पाहायला मिळतो माशाने कसं केलं मगरीला ठार 

ईलने कसं केलं मगरीला ठार? 

ईल ही माशांमधील एक खास प्रकारची प्रजाती आहे. या माशाच्या शेपटीत 860 व्होल्टचा करंट असतो असं म्हणतात. हा मासा स्वतःचा भचाव करण्यासाठी हा मासा शेपटीने करंट सोडतो. 

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मिडिआयवर प्रचंड व्हायरल झाला आहे.