Relationships : मुलीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली, पण धक्का तर तेव्हा बसला जेव्हा आईने...

मुलीने हा आपल्यासोबत आतापर्यंत झालेला सर्वात मोठा विश्वासघात आहे, असं म्हटलंय.   

Updated: Sep 28, 2022, 08:30 PM IST
Relationships : मुलीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली, पण धक्का तर तेव्हा बसला जेव्हा आईने... title=

Cheating In Relationship : आई-मुलीच्या (Mother-Daughter Relationship) नात्याची कशालाच तोड नाही. मात्र या मुलीची कहाणी ऐकल्यानंतर अनेकांना तिच्या आईचा राग आल्याचे दिसून आलं. या मुलीने सोशल मीडियावर (Social Media) एक व्हीडीओ शेअर केला. या व्हीडिओद्वारे आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली. हा व्हीडीओ इंटरनेटवर (Internet) खूप चर्चिला जात आहे. मुलीने हा आपल्यासोबत आतापर्यंत झालेला सर्वात मोठा विश्वासघात आहे, असं म्हटलंय. (shocking news mother affair with her daughter boyfriend and pregnant)

आईकडून खुलासा

व्हेनेसा (Vanessa) अमेरिकेत राहते. "मी सुट्टीसाठी मॅक्सीकोला गेली होती. त्यावेळी माझा प्रियकर आणि आई दोघेही घरी होते. मी आईला कॉल केला, तेव्हा ती रडू लागली. यानंतर काही दिवसांनी आईने धक्कादायक खुलासा केला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली.

बॉयफ्रेंडकडून गरोदर 

आईने गरोदर असल्याचं सांगताच व्हेनेसा ताई होणार म्हणून आनंदी झाली. मात्र हा आनंद क्षणिक होता. मात्र आईने व्हेनेसा यानंतर सांगितलं की होणारं अपत्य हे तिच्या प्रियकराचं आहे. यामुळे व्हेनेसाला मोठा धक्का बसला. व्हेनेसाचा पारा चढला. व्हेनेसाने मागचा पुढचा काहीही विचार न करता आई आणि  (Boyfriend) प्रियकराला (Block)  ब्लॉक केलं. यानंतर व्हेनेसाने सहल सोडून परत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तसेच व्हेनेसाने आपलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाली.  

Relationships: मां ने बेटी के बॉयफ्रेंड संग चलाया 'चक्कर', कहा- मैं तुम्हारे BF के बच्चे की...

व्हीडिओ व्हायरल

दरम्यान सोशल मीडियावर व्हेनेसाची ही डोळ्यात पाणी आणणारा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांन प्रियकर आणि आईबाबत संताप व्यक्त केलाय. कहर म्हणजे इतकं काही घडूनही प्रियकराने प्रेयसीची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्हेनेसाने प्रियकर आणि आईला माफ केलं नाही.