Viral Crime News : कधी कधी अनेक जण पैशापुढे नात्यांला किंमत देत नाहीत असाच एक धक्कादाय प्रकार चीन मध्ये घडला आहे. नातवंड म्हणजे आजी आजोबांचे जीव की प्राण असतात. मात्र, एका आजोबाने नातीचे अपहरण करुन लेकीकडे 60 लाखांची खंडणी मागीतली आहे. या वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आरोपीने हे कृत्य करण्यामागचे कारण समजल्यावर पोलिसही हादरले आहेत.
चीनच्या शांघाय शहरात हा प्रकार घडला आहे. 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला त्याच्याच नातीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. युआन असे या आरोपीचे नाव आहे. अपहरण प्रकरणाच्या तपासादरम्यान तो पलिसांच्या तावडीत सापडला आहे.
आरोपीला जुगाराचे व्यसन जडले होते. जुगारामुळे त्याच्या डोंगावर कर्जाचा डोंगर आला होता. तरी देखील त्याचे जुगार खेळण्याचे व्यसन सुटत नव्हते. त्याला आणखी पैशांची गरज होती. यामुळे त्याने आपल्या लेकीच्या मुलीचे अर्थात नातीचे अपहरण करण्याचा डाव रचला.
युआनची नात शाळेतून सुटल्यावर त्याने तिचे अपहरण केले. यानंतर त्याने मुलीला फोन केला आणि खंडणी मागितली. मुलीला जिवंत पहायचे असेल तर तीन दिवसात 72,500 डॉलर म्हणजेच सुमारे 60 लाख रुपये द्यावेत? या पैशाची वेळेवर व्यवस्था केली नाही तर तिला पुन्हा आपल्या मुलीचे तोंडही दिसणार नाही अशी धमकी दिली.
मुलीचे अपहरण झाल्यानंतर आलेल्या धमकीच्या फोनमुळे आरोपीची मुलगी भयभित झाली. तिने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी फोन नंबरचे लोकेशन ट्रेस केले. पोलिस अपहरणकर्त्यापर्यंत पोहचले. आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून आपला वडिल आहे. पित्यानेच आपल्या मुलीचे अपहरण केल्याचे पाहून तक्रारदार महिलेला धक्का बसला. यानंकर देखील आरोपीने पोलिसांसमोर आपल्या मुलाला शिगाळ करत तिच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीचे हे कृत्या पाहून पोलिसही शॉक झाले. महिलेच्या तक्रारीनंतर तिच्या पित्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटके केली आहे.