Elephant Viral Video: खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती...आईचा श्वास थांबला अन् मग...

Viral Video : आई शेवटी आईच असते! मुलाला संकटात पाहून तिने जे केलं त्यानंतर 3 दिवस 2 रात्र ती त्याच अवस्थेत होती. तिच्या श्वास थांबला त्यानंतर लेकऱ्याचा स्पर्शानंतर जो चमत्कार झाला  पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसतो.   

Updated: Apr 26, 2023, 12:07 PM IST
Elephant Viral Video: खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती...आईचा श्वास थांबला अन् मग... title=
Viral Video mother elephant risking her life to save her baby elephant Trending Video on social media trends

Elephant Viral Video : आई ही देवाचं रुप मानलं जातं. असं म्हणतात देव प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकतं नाही, म्हणून त्याने आई बनवली आहे. आपल्या पोटच्या लेकाला संकटात पाहून प्रत्येक आईचा जीव हा कासावीस होतो. अगदी माणसांपासून प्राण्यांपर्यंत आई आपल्या पिल्ला संटकात पाहू आपला जीव धोक्यात घालते. असाच एक हत्ती आणि बेबी हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. ज्यामध्ये हत्तीचं एक पिल्लू खड्ड्यात पडत आणि त्याला वाचविण्यासाठी स्थानिकांचा प्रयत्न सुरु आहे. हत्तीचं बाळ भीतीने जोरजोरात ओरडताना दिसतं आहे. आपल्या लेकाची किंकाळी ऐकून मादी हत्ती पिल्लाकडे धाव घेते. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिखलात पडलेल्या पिल्ला पाहून हत्ती खड्ड्यात शिरण्याचा प्रयत्न करते. जवळपास तीन दिवस आणि दोन रात्री ती त्या अवस्थेत आपल्या पिल्लाला दूध पाजते. 

खड्ड्याची जागा कमी असल्याने अशा परिस्थितीत हत्तीचा श्वास गुदमरतो आणि तिची प्रकृती बिघते. त्यानंतर स्थानिक क्रेनच्या साहाय्याने हत्तीची सुटका करतात. मात्र उशीर झालेला असतो, हत्तीचा श्वास थांबलेला असतो. काही लोक हत्तीच्या हृदयाला पंप करतात. दरम्यान हत्तीच्या बाळालाही खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश मिळतो. (Viral Video mother elephant risking her life to save her baby elephant Trending Video on social media trends)

असं वाटलं सगळं संपलं...हत्ती पिल्लाने आईला गमावलं असंच सगळ्यांना वाटलं. तो पिल्लू आईच्याजवळ घुटमळत होता. अन् हे काय चमत्कार म्हणायलाच हवं. हत्ती पुन्हा श्वास घ्यायला लागतो. हा भावूक व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. पल्या पिल्लाला सुखरुप बघून हत्तीणीला आनंद होतो. ती आणि ते हत्तीचं पिल्लू दोघेही जंगलाच्या दिशेने निघून जातात.

आतापर्यंत हा व्हिडीओ 1.2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर @TansuYegen अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  हा संपूर्ण व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात पण हा व्हिडीओ हृदयस्पर्शी आहे.