Religious Conversion: दुर्गापुजेच्या शुभेच्छा देणं 'या' क्रिकेटरला पडलं महाग, कट्टरपंथियांकडून धमकी

कट्टरपंथियांच्या निशाण्यावर 'हा' क्रिकेटर, पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया

Updated: Sep 27, 2022, 05:32 PM IST
Religious Conversion: दुर्गापुजेच्या शुभेच्छा देणं 'या' क्रिकेटरला पडलं महाग, कट्टरपंथियांकडून धमकी title=

Religious Conversion: देशात नवरात्रोत्सवाचा (Navratrostav 2022) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताबरोबरच जगभरातील अनेक देशात हा सण साजरा होतो. बांगलादेशमध्येही (Bangladesh) सध्या नवरात्रोत्सावची धूम आहे. बांगलादेशमधचा हिंदू क्रिकेटर लिटन दासने देवीचा फोटो ट्विट करत नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा दिल्यानंतर लिटन दास बांगलादेशमधल्या कट्टरपंथियांच्या निशाण्यावर आला आहे. कट्टरपंथियांनी लिटन दासला (Litton Das) धर्मपरिवर्तन (Religious Conversion) करण्याची धमकी दिली आहे.

लिटन दासच्या ट्विटवर तीव्र प्रतिक्रिया
लिटन दास याने शुभेच्छांची पोस्ट केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सने लिटन दासला दुर्गा पुजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर कट्टरपंथियांनी लिटन दासला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. लिटन दासने रविवारी म्हणजे 25 सप्टेंबरला ही पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसात जवळपास 47 हजारांहून अधिक लाईक्स या पोस्टला मिळाल्या आहेत. तर जवळपास 6.3 हजार युजर्सने प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 

कृष्ण जन्माष्टमीच्याही दिल्या होत्या शुभेच्छा
लिटन दासने याआदी कृष्ण जन्माष्टमीच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळीही कट्टरपंथियांनी लिटन दासला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं होतं. लिटन दासने यावेळी फेसबुक पोस्टवर दुर्गा मातेचा फोटो ट्विट केला आहे. 'सुभो महालय! मां दुर्गा आ रही हैं.' असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

लिटन दासची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी
बांगलादेश क्रिकेट संघाचा विकेटकिपर आणि फलंदाज लिटन दास संघाचा प्रमुख खेळाडू आहे. लिटन दासने बांगलादेशसाठी आतापर्यंत 35 कसोटी, 57 एकदिवसीय आणि 55 टी20 सामने खेळला आहे.