...म्हणून चीन भारतासोबत मुद्दाम घालतोय वाद?

चीन विरोधात अनेक देश उघडपणे बोलू लागले आहेत.

शैलेश मुसळे | Updated: May 28, 2020, 10:07 PM IST
...म्हणून चीन भारतासोबत मुद्दाम घालतोय वाद? title=

मुंबई : संपूर्ण जग चीनमधून आलेला कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. १८० देशांमध्ये या कोरोनाचा व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. पण भारतासह आपल्या सर्व शेजार्‍यांशी वाद निर्माण करण्यात चीन गुंतला आहे. तर प्रश्न असा पडतो की, कोरोनाच्या अशा परिस्थितीही भारत आणि इतर देशांसोबत चीन वाद का घालत आहे.

जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. लोक लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जण आर्थिक अडचणीत आहेत. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ढासळत आहेत. पण चीन कोरोनाशी लढा देण्याऐवजी शेजार्‍यांशी लढत आहे. चीनचे अध्यक्ष युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश सैन्याला देत आहेत. खरंतर चीन ही वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करत आहे. जगाचं लक्ष इतर गोष्टींकडे खेचण्याचं काम करत आहे. कारण कोरोना आता रौद्र रुप धारण करत आहे. यामुळे जगभरातील अनेक देश चीनवर संताप व्यक्त करत आहेत.

कोरोना विषाणूमुळे झालेल्या हानीसाठी देश चीनला दोष देत आहे. प्रथम, अमेरिकेने चीनसोबत असलेले सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया समोर आला. कोरोना विषाणूची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी चीनवर सतत दबाव आणत आहे. संयुक्त राष्ट्रात या चौकशीची मागणी करणाऱ्या देशांची संख्या 62 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूचं मुळ शोधण्यासाठी चीनविरोधात चौकशी करण्याच्या मागणीवर हे सर्वजण ठाम आहेत. कारण त्यांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूचं मूळ कोणता प्राणी नसून वुहानमधील लॅब आहे.

जग कोरोनाशी लढत आहे आणि चीन आरामात बसला आहे. त्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. चीनविरूद्ध स्वतंत्र चौकशी झाली तर चीनला हे अवघड जाईल. म्हणून चीनला जगाचे लक्ष कोरोनापासून दूर करायचे आहे. चीन मुद्दाम भारतासोबत वाद घातल आहे. कारण इतर लहान देशांसोबत वाद घातला तर जग लक्ष देणार नाही. पण भारतासारख्या मोठ्या आणि महत्त्वाचा देशासोबत जर वाद घातला तर संपूर्ण जगाचं लक्ष याकडे वळलं जाईल.

या वादाचे दुसरे कारण म्हणजे कोरोना प्रकरणात चीनविरूद्ध स्वतंत्र चौकशीची मागणी करणार्‍या अशा देशांना भारत सतत पाठिंबा देत आहे. भारतीय सीमेवर घुसखोरी करणे शक्य आहे. याचा भारताकडून सूड घेण्याचा तो प्रयत्न करीत आहे. आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोरोना विषाणूमुळे खराब झालेली चीनची प्रतिमा संपल्यानंतर जगातील बड्या कंपन्या चीन सोडून भारताकडे वळत आहेत. ज्यामुळे चीन बर्‍यापैकी चिडला आहे. म्हणून तो सर्व बाजूंनी भारताला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तान आणि भारतामध्ये ही वाद सुरु ठेवण्यासाठी चीन पाकिस्तानला मदत करत राहिला आहे.

कोरोना व्हायरस पसरवण्याच्या आरोपाखाली चीन गोत्यात सापडला आहे. चीन केवळ भारताबरोबरच नाही तर इतर शेजारी देशांसोबत देखील वाद निर्माण करत आहे. उदाहरणार्थ, तैवान, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग आणि फिलिपिन्सशी वाद निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर त्याने दक्षिण चीनच्या समुद्र भागात ही गोंधळ निर्माण करून अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाला भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता चीनचा हा डाव जगाला कळाला आहे.